तुळजा राजा पहिले

 

तुळजा राजा पहिले (इ.स.१७२८-१७३५)
तुळजाराजा राजकारणी, मुत्सद्दी व विद्याभिलाषी होते. तुळजाराजांच्या काळात कर्नाटकाच्या नवाबाबाखेरीज आणखी कुणाशी संघर्ष झाला नाही. कर्नाटकात या काळात अनेक सुभेदार, नवाब आपले स्वतंत्र राज्य निर्माण करू पाहत होते. इसवी सन १७१० मध्ये कर्नाटकाचा नबवा दिवान सादतउल्लाखान हा आपली सत्ता वाढविण्याचा प्रयत्न करीत होता. त्यामुळे नवाबाची नजर त्याच्या शेजारील तंजावर व त्रिचनापल्ली या संस्थानांवर होती.
परंतु तुळजाराजांनी दक्ष राहून नवाबापासून तंजावर सुरक्षित ठेवले. मराठ्यांना या प्रसंगी तुळजाराजांस मदत करण्याची इच्छा होती हे पेशवे दप्तरातील कागदपत्रांवरून लक्षात येते. परंतु मराठ्यांची मदत तंजावरात पोहोचू शकली नसावी. कारण या वेळेस शाहू व कोल्हापूरचे संभाजी यांच्यात संघर्ष चालू असल्यामुळे मराठ्यांच्या फौजा महाराष्ट्रातच गुंतल्या होत्या. त्यामुळे कर्नाटकात निजामाचे प्राबल्य वाढले.
शत्रूशी सामना करीत असताना कलेचे क्षेत्र तुळजा राजांनी दुर्लक्षित ठेवले नाही. तुळजा राजांनी स्वतः "संगीत सारामृत" नावाचा ग्रंथ लिहिला. तुळजाराजा यांनी स्वतः मराठी व तामिळ भाषेत भक्तीपर रचना केल्या. नृत्य कलेस प्रोत्साहन दिले. "कोव्यची साहित्याचे जीनस" ही तामिळ भाषेत नृत्य कलेवर आधारित रचना केली.

तुळजा राजांना लग्नाच्या पाच स्त्रिया होत्या. अरणाबाई, रामकुवर बाई, मोहिनाबाई, मैनाबाई व लक्ष्मीबाई अशी त्यांची नावे होती. बाबासाहेब सयाजी, अण्णासाहेब अशी तीन मुले तुळजा राजांना होती. अन्नपूर्णाबाई ही तुळजा राजांनी काट्यारीशी लग्न लावलेली स्त्री होती. तिचा पुत्र म्हणजेच प्रतापसिंह होय. तुळजा राजानंतर त्यांचा पुत्र बाबासाहेब गादीवर आले. हेच व्यंकोजी दुसरे म्हणून ओळखले जातात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

एकूण पृष्ठदृश्ये