राजा सरभोजी पहिले

 

राजा सरभोजी पहिले (इ.स. १७११ ते १७२८)
तंजावर चे महाराजा दुसरे हे निपुत्रिक असल्यामुळे त्यांच्या नंतर त्यांचा कनिष्ठ बंधू सरभोजी पहिले गादीवर आले. सरभोजी राजांनी एकूण सोळा वर्ष राज्य केले. सरभोजी राजे हे शांतताप्रिय व सौम्य प्रकृतीचे होते.
सरभोजी राजांच्या कारकिर्दीत किरकोळ युद्धाचे प्रसंग सोडल्यास मोठी युद्ध झालेच नाहीत. याला एकच अपवाद म्हणजे मारवाच्या संस्थानातील वारस हक्कासंबंधीचा संघर्ष. या संघर्षामध्ये सरभोजी राजांनी मारवाचा एक वारसदार ताडदेव याला विरोध केला परंतु त्याबदल्यात दुसरा वारसदार भवानी शंकरने पंबर नदीच्या जवळचा प्रदेश देण्यात टाळाटाळ केली त्यामुळे सरभोजी राजांनी मारवाचे राज्य भवानीशंकर ऐवजी ताडदेवास मिळवून दिले.
इसवी सन १७२४ च्या सुमारास निजामाने आपली वक्रदृष्टी त्रिचनापल्ली कडे वळवली त्यामुळे तंजावरकरांना धोका निर्माण झाला होता. मराठ्यांना चौथाई व सरदेशमुखीचे हक्क मुघल बादशहाकडून मिळाले होते, परंतु त्यांच्या हक्काला निजामाने आव्हान दिले. त्यामुळे निजामास शह देण्यास व आपला चौथाई सरदेशमुखीच्या हक्क बजावण्यास मराठ्यांच्या फौजा दक्षिणेत उतरल्या. मराठ्यांनी निजामाला प्रबळ होऊ दिले नाही आणि तंजावरचा धोका टळला.
किरकोळ युद्धाचे प्रसंग सोडल्यास सर्व राज्यांचे कारकीर्दही शांततेत पार पडली सरभोजींना गृहकलहाला मात्र तोंड द्यावे लागले. सरभोजी राजांचा बंधु तुळजाराछा स्वतंत्र पणाने राहत होता. सरभोजी राजांना तीन राण्या होत्या- सुलक्षणाबाई, अप्रूपबाईसाहेब, राजसबाईसाहेब.
तंजावरची गादी सरभोजी राजांच्या पश्चात त्यांचा भाऊ तुळजाराजा यास मिळणार होती. अप्रूप बाईस मात्र अशाप्रकारे वारसाहक्क तुळजाराजाकडे जाणे पसंत नव्हते. ती महत्त्वाकांक्षी असल्यामुळे राजसत्ता आपल्याकडेच राहावी ही अप्रूपबाईची इच्छा होती. तिने आपल्याला पुत्र झाला असे खोटेच जाहीर करून वारसा हक्क आपल्या मुलाला मिळाला पाहिजे असा दावा मांडला. परंतु ही गोष्ट बनावट असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणात सरभोजी राजांना खूप दुःख व मनस्ताप झाला. इ.स. १७२८ मध्ये सरभोजी राजांचा मृत्यू झाला. त्यांपाठोपाठ सुलक्षणाबाई व राजसबाई सती गेल्या.

बाह्य संघर्ष व अंतर्गत कलहाला तोंड देत असतानाच पूर्वीपासून चालत आलेली वाड्मयीन सेवा सरभोजींनी आपल्या राज्यात तशीच चालु ठेवली. त्यांनी अनेक प्रतिभावंतांना आश्रय दिला. 'विद्यापरिणय' सारखे मराठी नाटक, कुटात्मक श्लोक या काळातले रचले गेले. नाट्यसंगीतासारख्या कलांना सरभोजींनी प्रोत्साहन दिले व कलेच्या क्षेत्रात आपले नाव झळकत ठेवले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

एकूण पृष्ठदृश्ये