किल्ल्याचे नाव | विसापूर किल्ला |
प्रकार | गिरिदुर्ग |
ठिकाण | हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यामधील लोणावळा गावाजवळ वसलेला आहे |
डोंगर रांग | मुख्य डोंगर रांग सह्याद्री आणि उप डोंगर रांग मावळ |
उंची | समुद्रसपाटी पासून ३५५० फुट |
किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे | प्राचीन लेणी, विशाल कमानी, हनुमानाला समर्पित मंदिरे, प्राचीन शैलीच्या गुहा आणि प्राचीन पाण्याचे कुंड |
विसापूर ऊर्फ संबळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
मुबईहून पुण्याकडे जातांना लोणावळा सोडले की लोहगड-विसापूर ही जोडगोळी गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेत असते. मळवली रेल्वेस्थानकावर उतरल्यावर समोरच दिसतो तो म्हणजे लोहगड. मात्र डोंगरामागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात गेल्यावरच नजरेस पडतो. पवन मावळात मोडणारा हा विसापूर किल्ला खंडाळा (बोर) घाटाचे संरक्षण करतो. पूर्वीपासूनच दुर्लक्षित असलेला हा विसापूर किल्ला इतिहासात फार मोठे असे स्थान मिळवू शकला नाही.
विसापूर हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यामधील लोणावळा गावाजवळ मावळ ( सह्याद्री ) नावाच्या डोंगर रांगेवर विस्तारलेला आहे. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून या किल्ल्यचा आकार चौकडी आहे आणि या किल्ल्याची उंची समुद्रसपाटी पासून ३५५० फुट इतकी आहे. या किल्ल्याला कातळ कड्याचे नैसर्गिक संरक्षण लाभलेले आहे आणि या किल्ल्यामध्ये जाण्यासाठी २ प्रवेश दरवाजे आहेत.
त्याचबरोबर या किल्ल्याला भक्कम अशी तटबंदी देखील आहे. विसापूर या किल्ल्यामध्ये आपल्यला प्राचीन लेणी, विशाल कमानी, पाण्याच्या विहिरी त्याचबरोबर या किल्ल्यामध्ये पडझड झालेल्या काही इमारती देखील पाहायला मिळते. त्याचबरोबर किल्ल्यावर हनुमानाला समर्पित मंदिरे देखील पाहायला मिळतात. असे म्हणतात कि या किल्ल्यावर असणारी विहीर पांडवांच्या काळामध्ये बांधलेली आहे. त्याचबरोबर या किल्ल्यावर एलिझाबेथ या राणीच्या कारभाऱ्यांची बंदूक आणि दारूगोळे सापडले होते तसेच विसापूर या किल्ल्यामध्ये प्राचीन शैलीच्या गुहा, प्राचीन पाण्याचे कुंड, तेथे असणारी प्राचीन घरांचे अवशेष आणि विशाल गिरिनी पाहायला मिळतात.
इतिहास
विसापूर हा किल्ला बालाजी विश्वनाथ यांनी इ. स. १७१३ ते इ. स. १७२० च्या काळामध्ये बांधला असून हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे. बालाजी विश्वनाथ यांनी हा किल्ला कोकण तसेच तेथील बोर घाटावरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी बांधला होता. बालाजी विश्वनाथ हे मराठा साम्राज्याचे पहिले पेशवा होते.
विसापूर हा किल्ला लोहगड बांधल्यानंतर किती तरी दिवसांनी बांधला आहे आणि लोहगड आणि विसापूर हे दोन किल्ले एकमेकांशी जोडलेले आहेत. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता त्यावेळी त्यांनी विसापूर किल्ला देखील घेतला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याला महत्वाचे स्थान होते.
ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबमध्ये (मुगल) पुरंदरचा तह झाला होता त्यावेळी महाराजांना एकूण २३ किल्ले औरंगजेबाला द्यावे लागले होते आणि या २३ किल्ल्यामध्ये विसापूर हा किल्ला देखील होता. त्यावेळी मुगलांनी या किल्ल्यावर काही दिवस राज्य केले आहे त्यानंतर हा किल्ला परत स्वराज्यामध्ये सामील केला होता.
इ. स. १८०० मध्ये ब्रीटीशांनी भारतावर आक्रमण केले आणि त्यावेळी त्यांनी पेशव्यांच्या किल्ल्यांवर देखील हल्ले करण्यास सुरुवात केली आणि त्यांनी इ. स. १८१८ मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणे विसापूर किल्ला देखील आपल्या ताब्यात घेतला. ज्यावेळी हा किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात गेल्यानंतर ब्रिटीशांनी विसापूर या किल्ल्याची मोठ्या प्रमाणात नासधूस केली.
ब्रिटीशांनी विसापूर किल्ल्यावर केलेले शासन
इ. स. १८१८ मध्ये विसापूर आणि लोहगड हे दोन्हीही किल्ले ब्रिटीशांच्या ताब्यात गेल्यानंतर या दोन्ही किल्ल्यांचे प्रतिनिधित्व ब्रिटीश कर्नल प्रोथेरच्या ताब्यात होते. या किल्ल्याला दोन दरवाजे (कोकण दरवाजा आणि डेक्कन दरवाजा) आणि त्याला भक्कम अशी तटबंदीची भिंत होती आणि या दोन्हीही तटबंदीला सामरिक महत्व असल्यामुळे ब्रिटीशांनी हि दोन्हीही दरवाजे पाडून टाकली आणि किल्ला त्यांच्या वर्चस्वा खाली असताना किल्ल्याची मोठ्या प्रमाणात नासधूस केली.
त्याचबरोबर या किल्ल्यामध्ये उत्तरेच्या तटबंदीच्या भिंती जवळ एक ४ इंचाची लोखंडी बंदूक सापडली होती आणि हि बंदूक एलिझाबेथ राणीच्या कारकिर्दीतील असावी असे काही इतिहासकारांनी सांगितले आहे.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
विहीर :
आपल्याला विसापूर या किल्ल्यावर एक विहीर पाहायला मिळते आणि या विहिरीबद्दल असे सांगितले जाते कि हि विहीर पांडवांच्या काळामध्ये बांधलेली विहीर आहे. पूर्वीच्या काळी बहुतेक या विहिरीतील पाणी गडावरील लोक रोजच्या वापरासाठी किवा पिण्याच्या पाण्यासाठी वापर करत असतील.
बुरुज :
इतर किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्यावर देखील बुरुज बांधले होते कारण बुरुजावरूनच शत्रूच्या हालचालींवर तसेच कोकण आणि बोर घाटावर लक्ष ठेवले जायचे. आज हे बुरुज उद्वस्त अवस्थेत आहेत.
- आपल्याला या किल्ल्यावर प्राचीन लेण्या आणि प्राचीन शैलीतील गुहा पाहायला मिळतात.
दरवाजे :
विसापूर या किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी २ दरवाजे होते एक कोकण दरवाजा आणि दुसरा पश्चिम ( डेक्कन ) दरवाजा. ज्यावेळी या किल्ल्यावर ब्रिटीशांचे राज्य होते त्यावेळी ब्रिटिशांनी हे दोन्हीही दरवाजे पाडून टाकले.
- विसापूर या किल्ल्यावर आपल्याला हनुमानाला समर्पित मंदिरे देखील पाहायला मिळतात.
किल्ल्यावरील इतर प्राची ठिकाणे :
विशाल कमानी, प्राचीन पाण्याचे कुंड, तेथे असणारी प्राचीन घरांचे अवशेष, विशाल गिरिनी आणि इतर पडझड झालेल्या प्राचीन इमारती आपल्यला किल्ल्यावर पाहायला मिळतात.
किल्ल्याच्या जवळील इतर आकर्षणे
भागा गुहा :
भागा गुहा हि किल्ल्यापासून २ ते ३ किलो मीटर अंतरावर आहे आणि हि गुहा पूर्वीच्या काळी बुध्द संतांचे घर होते.
आमी घाटी शहर :
आमी घाटी शहर हे लोणावळा गावापासून २२ ते २३ किलो मीटर अंतरावर आहे. आपण विसापूर हा किल्ला पाहायला गेल्यानंतर हे शहर देखील पाहू शकतो.
वाळवण धरन :
हा किल्ला पाहायला गेल्यानंतर आपण लोणावळ्याजवळ असणारे वाळवण धरण देखील पाहू शकतो.
लोणावळा :
लोणावळा हे शहर एक प्रसिध्द पहाडी भाग आहे आणि हे किल्ल्यापासून २० किलो मीटर अंतरावर आहे.
लोहगड :
लोहगड हा किल्ला विसापूर या किल्ल्याशी जोडलेला आहे आणि हा किल्ला विसापूर किल्ल्याजवळ असल्यामुळे आपण विसापूर किल्ल्यासोबत लोहगड किल्ला देखील पाहू शकतो.
गडावर जाण्याच्या वाटा
मुंबई-पुणे लोहमार्गावर मळवली या छोट्या रेल्वे स्थानकावर उतरावे. येथून भाजे गावात यावे. भाजे गावातून विसापूर किल्ल्यावर जाण्यास दोन वाटा आहेत.
- १) पहिल्या वाटेने गडावर जायचे झाल्यास वाटाडा घेणे आवश्यक ठरते. भाजे लेण्यांना जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्या सोडून एक पायवाट जंगलात गेलेली दिसते. उजवीकडची पायवाट धरल्यावर २० मिनिटे चालून गेल्यावर काही घरे लागतात. या वाटेने आपण पुन्हा एकदा मोडकळीस आलेल्या पायऱ्यांपाशी पोहचतो. येथे बाजूलाच एक मंदिर आहे.
- २) दुसऱ्या वाटेने भाजे गावातून गायमुख खिंडीपर्यंत यावे. गायमुख खिंडीतून डावीकडे जंगलात जाणारी वाट थेट विसापूर किल्ल्यावर घेऊन जाते.
- ३) मळवली स्थानकातून बाहेर आल्यावर वाटेत एक्सप्रेस हायवे लागतो. हायवे पार करण्यासाठी बांधलेल्या पादचारी पुलावरून डावीकडे उतरणारा जिना उतरल्यावर पाटण गाव लागते. याच पाटण गावातून विसापूरवर जाण्याचा रस्ता आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा