मराठी आणि संस्कृत भाषा प्रात्साहन व विकास
शिवरायांच्या काळात राज्यकारभारात पारशी भाषेचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे. पण शिवरायांनी यात महत्त्वाचे बदल केले. शिवरायांनी आपल्या अधिकाऱ्यांची एक समिती नेमली. या समितीकडे पारशी व अरेबिक शब्दांऐवजी वापरता येण्यासारखे संस्कृत शब्द सुचवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. या समितीने १६७७ मध्ये 'राज्यव्यवहारकोष' नावाचा शब्दकोश सादर केला. शिवरायांची राजमुद्रादेखील संस्कृतमधेच होती.
धर्मविषयक धोरण
शिवाजी महाराजांनी धर्मनिरपेक्ष व सहिष्णु वृत्तीने राज्यकारभार चालवला. विविध धर्मांतील समन्वयावर त्यांचा विश्वास होता. जेव्हा औरंगझेबाने जिझिया कर आकारण्यास सुरुवात केली तेव्हा शिवरायांनी एका पत्राद्वारे जिझिया कर रद्द करण्याची मागणी करत औरंगझेबला त्यांनी अकबराप्रमाणे हिंदू धर्मातील श्रद्धा आणि क्षेत्रांबद्दल आदराने वागण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सैन्यात सुरुवातीपासून मुस्लीम लोकांचा समावेश होता. १६५६ मध्ये पठाणांची पहिली तुकडी बनवण्यात आली. दर्या सारंग, शिवरायांच्या नौदलाचा प्रमुख एक मुस्लीम होता. संत रामदासांना शिवरायांचे गुरू मानण्यात येत होते, पण अलीकडील संशोधनावरून स्पष्ट झाले आहे की संत रामदास शिवरायांना कारकिर्दीच्या उत्तराधार्थ भेटले