महाराजांचे स्वरूप

 


छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अलौकिक व्यक्तिमत्व त्यांच्या गुणांची, कार्याची स्वरूपाची छाप ही भारतीयांसहित परदेशी राज्यकर्त्यांवरही पडली होती.

त्यांच्या स्वरूपाचे वर्णन त्यांना प्रत्यक्ष पाहिलेल्या समकालीन एतद्देशीय  परदेशी लेखकांनी केले आहे ते वाचून शिवाजी महाराजांच्या स्वरूपाची कल्पना येऊ शकेल.

शिवाजी महाराजांच्या स्वरूपाचे वर्णन विविध व्यक्तींनी जसे केले तसेच जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करू. यामध्ये त्या व्यक्तींनी वापरलेल्या शब्दांचे जसेच्या तसेच मराठी भाषांतर आहे.


शिवाजी महाराजांच्या स्वरूपाचे परदेशी लेखकांनी केलेले वर्णन

रेव्हरंड एस्कॅलियटशिवाजी हा मध्यम उंचीचा, ताठ बांधेसूद आहे. तो चलाख असून सस्मित बोलतो. त्याची दृष्टी तीक्ष्ण तरल असून त्याचा वर्ण त्याच्या इतर देशबांधवांपेक्षा अधिक गोरा आहे

थेवेनॉटशिवाजीचे डोळे अतिशय तीक्ष्ण विलक्षण तेजस्वी आहेत. त्याची बुद्धिमत्ता त्यातून व्यक्त होते. तो दिवसातून एकच वेळ सामान्यतः भोजन करतो. तरीही त्याचे आरोग्य उत्कृष्ट आहे

कास्मोडा गार्डशिवाजी केवळ काम करण्याची तडफ असलेला पुरुष नसून त्याचे शरीरही डौलदार आहे. त्याचा चेहरा आकर्षक आहे आणि निसर्गाने त्याचे व्यक्तिमत्व अत्यंत परिपूर्ण आहे. विशेषतः त्याचे काळेभोर विशाल नेत्र इतके भेदक आहेत की तो जर ताक लावून पाहू लागला तर त्यातून ठिणग्या बाहेर पडतात की काय असे वाटते. त्याचबरोबर तरल, तीक्ष्ण, स्पष्ट तंतोतंत निर्णय त्याची प्रतिभाही व्यक्त होते.

हेन्री ऑक्झेडन चेहरा सुंदर पाणीदार, इतर मराठ्यांच्या मानाने वर्ण गोरा, डोळे तीक्ष्ण, नाक लांब, बांकदार थोडेसे खाली आलेले, दाढी कापून हनुवटीच्या वर टोकदार केलेली आहे. मिशी बारीक मुद्रेत त्वरा, निश्चय, कठोरपणा, जागरूकता हे गुण स्पष्ट दिसून येतात.


शिवाजी महाराजांच्या स्वरूपाचे एतद्देशीय लेखकांनी केलेले वर्णन

समर्थ रामदासधीर, उदार, सुंदर..शूर क्रियेसी तत्पर, सावधपणे नृपवर तुच्छ केला..

कवींद्र परमानंदलावण्य अपार, वर्ण सुवर्णासारखा, शरीर निरोगी, मान अत्यंत सुंदर खांदे उंच होते. कपाळावर सुंदर कुंतलाग्ने पडल्यामुळे ते मोहक दिसत होते. नेत्र कमळाप्रमाणे सुंदर, नासिका ताज्या पळसाच्या पुष्पासारखी, मुख स्वभावतःच हसरे, स्वर मेघासारखे गंभीर, विशाल छाती आणि मोठे बाहू.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

एकूण पृष्ठदृश्ये