प्रतापगड

 


नाव : प्रतापगड

उंची : ३५५६ फूट

प्रकार : गिरिदुर्ग

चढाईची श्रेणी : सोपी

ठिकाण : सातारा, महाराष्ट्र

जवळचे गाव : महाबळेश्वर, आंबेनळी घाट

डोंगररांग : सातारा

सध्याची अवस्था : व्यवस्थित


प्रतापगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

छत्रपती शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी केलेल्या पराक्रमाच्या यशोगाथा आपण इतिहासात वाचत आलो आहोत. या यशोगाथा आज देखील महाराजांच्या पराक्रमाची आणि शौर्याची आणि त्यांच्या गनिमीकाव्याची आठवण करून द्यायला पुरेश्या आहेत.

महाराजांनी केलेल्या पराक्रमावर अनेक कवनं, ओव्या, गीतं, पोवाडे रचल्या गेले, ते ऐकतांना अंगावर शहारे येतात आणि त्यावेळी महाराजांनी तो प्रसंग कश्यापद्धतीने निभावून नेला असेल या कल्पनेत आपण ध्यानमग्न होतो. प्रतापगडावरील महाराजांची आणि अफजलखानाची भेट देखील इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरण्यात आली आहे. त्या भेटीवर पोवाडे देखील गायले गेले आहेत.

वाहनतळावरून गडाच्या दक्षिणेच्या टेहळणी बुरुजाखालून सरळ जाणाऱ्या पायवाटेने आपण थोड्या वेळातच तटबंदीत लपविलेल्या पश्चिमाभिमुख महादरवाज्यात येऊन पोहोचतो. वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन रितीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो. महादरवाज्यातून आत गेले की उजव्या हातालाच चिलखती बांधणीचा बुरूज दिसतो. हा बुरूज पाहून परत पायऱ्यांच्या मार्गाने भवानी मंदिराकडे जाता येते. मंदिरात भवानीमातेची सालंकृत प्रसन्न मूर्ती आहे. ही मूर्ती महराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळिग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतली. या मूर्तीशेजारीच छत्रपती शिवाजी महाराजच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती श्री हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे.

ह्या मंदिरासमोरून बालेकिल्ल्याकडे चालू लागल्यास उजव्या हाताला समर्थस्थापित हनुमानाची मूर्ती दिसते; पुढे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो. मंदिरात भव्य शिवलिंग आहे. या मंदिराशेजारीच प्रशस्त सदर आहे.किल्ल्याच्या बुरुजावरून आजूबाजूला पहिले असता मोठमोठे पर्वत दिसतात.आणि या प्रत्येक पर्वतांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.

केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस राजमाता जिजाबाईच्या वाड्याचे अवशेष आहेत. येथे उजवीकडे बगीचाच्या मधोमध शिवाजीचा महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे.या पुतळ्याच्या जागीच पूर्वी राजांचा राहता वाडा होता. या पुतळ्याशेजारीच शासकीय विश्रामधाम असून येथील बागेतून उजव्या बाजूच्या वाटेने तटावर जाऊन तटबंदीवरून फेरफटका मारताना जावळी खोऱ्याचे विहंगम दृश्य दिसते. किल्ल्याला महादरवाज्याखेरीज घोरपडीचे चित्र असणारा राजपहाऱ्याचा दिंडी दरवाजा आहे. त्याच्या जवळ रेडका बुरूज, पुढे यशवंत बुरूज, तर त्याच्यापुढे सूर्य बुरूज हे बुरूज आहेत.

अफजलखानाने दगा केल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला मारले. त्यानंतर संभाजी कावजी या मर्दानी गड्याने अफजलखानाचे शिर या बुरुजात पुरले, असे इतिहास सांगतो. भवानीच्या नगरखान्याची खिडकी उघडून पाहिल्यानंतर देवीचा चेहरा दिसतो. या देवीचीही एक कथा सांगितले जाते. शिवाजी महाराजांनी या देवीसाठी रोज सनई चौघडा वाजविण्याची प्रथा सुरू केली होती. हडप आडनावाचा पुजारी तिला पंचामृतासह नैवेद्य दाखवीत असे. या भवानीमंदिरात सभामंडप व नगारखाना आहे. मंदिरापासून शे-दोनशे पावले चढल्यावर एक छोटेखानी दरवाजा लागतो आणि तेथूनच किल्ल्यात प्रवेश होतो. त्याच्यापुढे एक पडीक चौथरा आहे. विमानातून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फुलपाखरासारखा दिसतो. १४०० फूट लांबी आणि ४०० फूट रुंदी एवढा त्याचा विस्तार आहे. इतर गडापेक्षा या गडाला विशेष चांगली तटबंदी आहे. वायव्येकडील कडे ८०० फुटांहून अधिक उंच आहेत. बालेकिल्ल्याच्या ईशान्येला किल्यातल्या दोन तळी आहेत. तेथून कोयनेचे खोरे सुंदर दिसते. आणि येथेच ही किल्ल्याची फेरी पूर्ण होते.


इतिहास

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम इ.स.१६५६ पार पडलेे.

छत्रपती राजाराम महाराज गडावर एप्रिल १६८९ ते १० ऑगस्ट १६८९ पर्यंत वास्तव्यास होते, छत्रपती राजाराम महाराज यांची काकरखान सोबत पहिली लढाई याच गडाच्या पायथ्याशी झाली, नेत्रदीपक कामगिरी बजावली होती या लढाईत पायदळ प्रमुख पिलाजी गोळे हे छत्रपती सोबत चिलखती प्रमाणे पुढे होते ,

इ.स.१६५६ ते इ.स १८१८ काही महिने सोडल्यास हा किल्ला शत्रु पासुन अभेद्य राहिला.

१७ फुटाचा ब्रॉन्झचा शिवाजी महाराजाचा पुतळ्याचे उदघाटन इ.स १९५७ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले.


प्रतापगड किलेची रचना

  • प्रतापगड किल्ला 2 भाग मध्ये विभाजित केला गेला आहे. काही गोष्टी सांगायच्या झाल्या तरी त्या म्हणाल्या, उपरी किल्बला बनविण्याबद्दल एक पहाणी झाली आणि जवळपास 180 वर्ग लांबी, अनेक स्थाई इमारती पाहण्यास मिळेल.

  • किल्ले उत्तर पश्चिमेकडील भागातील देवदेवता महादेव मंदिर आहेत, ज्याचा 250 वर्ग ऊंची ओघं चट्टानांवर आहे. दुसरीकडे, किलेच्या दक्षिण-पूर्व मुलांवर निचले किले उयारे टॉवर आणि गढोंमधून बचाव, 10-10 वर्ग उंची असते.

  • 1661 मध्ये, शिवाजी महाराज तुळजापुरात देवी भवानी मंदिरात जाणे असमर्थ आहे. त्यांनी या किलेमध्ये देवीचे मंदिर बनवण्याचा निर्णय घेतला. हे मंदिर निचले किलेचा पूर्वी भाग आहे. मंदिर दगड बनवित आहे आणि इतर देवीच्या काळी दगडांची मूर्ती पाहण्यास मिळेल.

प्रतापगड किल्ला प्रसिद्ध ठिकाणे

अफझलखानची थडगी : अफझलखानची थडगे हे मुख्य आकर्षण करते. हे किल्ल्यापासून दक्षिण-पूर्वेस काही अंतरावर पाहण्यास मिळेल.

प्रवेशद्वार : प्रवेशद्वार खूप सुंदर आहे आणि अद्यापही चांगल्या स्थितीत असते.

देवी भवानी मंदिर : हे मंदिर मूळतः शिवाजी महाराजांनी बनवले होते आणि त्यांनी मंदिरात भवानी देवीची सुंदर मूर्ती स्थापित केली होती. हंबीरावांनाही मंदिरात मोहितची तलवार दिसू शकते.


प्रतापगड किल्ल्याविषयी काही तथ्य

  • हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी नीरा व कोयना नदीच्या काठावर आणि संरक्षणासाठी बांधला गेला.

  • या किल्ल्याच्या उत्तर-पश्चिम दिशेला समुद्र किनाऱ्यापासून 1000 मीटर उंचीवर भगवान शंकराचे मंदिर देखील वसलेले दिसते.

  • हा किल्ला निम्न भागात आणि वरचा किल्ला अशा दोन भागात विभागला गेला आहे.

  • वरचा किल्ला डोंगराच्या शिखरावर बांधला गेला. हे प्रत्येक बाजूला अंदाजे चौरस आणि 180 मीटर लांबीचे आहे. येथे महादेवाच्या मंदिरासह अनेक कायम इमारती दिसते. हे किल्ल्याच्या उत्तर-पश्चिमेस आहे आणि त्याच्या सभोवती 250 मीटरपर्यंत थेंब असलेल्या कडाड्यांनी वेढलेले आहे.

  • सन 1661 मध्ये शिवाजी महाराजांना तुळजापूरमधील भवानी देवीच्या मंदिरात जाता आले नाही, म्हणून त्यांनी गडावर मातेचे मंदिर बांधण्याचे ठरविले. खालच्या किल्ल्याच्या पूर्वेकडील बाजूला मंदिर पाहण्यास मिळते. हे मंदिर दगडाने बनलेले आहे आणि त्यात मां कालीची दगडी मूर्ती दिसते.

  • मूळ मंदिरानंतर या मंदिराची इमारत पुन्हा तयार केली गेली आहे, तर मूळ खोलीत लाकडी स्तंभ 50 लांब, 30 ′ रुंद आणि 12 ′ उंच आहे.

  • खालचा किल्ला सुमारे 320 मीटर लांब आणि 110 मीटर रूंदीचा आहे. हे किल्ल्याच्या दक्षिण-पूर्वेस आहे, ज्यास 10 ते 12 मीटर उंच मनोरे आणि बुरुज बांधले गेले आहे.

  • 1960 मध्ये किल्ल्याच्या आत एक गेस्ट हाऊस आणि एक राष्ट्रीय उद्यानही बांधलेले दिसते.

  • सध्या हा किल्ला पूर्वीच्या सातारा राज्याचे उत्तराधिकारी उदयराजे भोसले यांच्या मालकीचा आहे.

  • किल्ल्याच्या दक्षिणपूर्व भागात अफझलखानची एक समाधी देखील बांधली गेली आहे, जो किल्ल्याचे मुख्य आकर्षण दिसते.

  • याच किल्ल्यात शिवाजी महाराजांनी 1659 मध्ये अफझलखान विरुद्ध पहिला विजय मिळविला, हा विजय मराठा साम्राज्याचा पाया मानला जात आहे.

  • समुद्रसपाटीपासून उंचीवर असलेला हा किल्ला पर्यटकांमध्ये ट्रेकिंगसाठी खूप लोकप्रिय मनाला जातो. ट्रेकिंग करताना आपण हिरवीगार पालवी आणि विरंगुळ्याचा आनंद घेऊ शकता.

  • हा किल्ला सातारा शहरापासून 20 किमी अंतरावर असून महाबळेश्वर पासून सुमारे 2 कि.मी. अंतरावर आहे. आणि समुद्रसपाटीपासून 1,080 मीटर वर आहे.

  • राज्यातर्फे चालविल्या जाणाऱ्या खासगी आणि सरकारी बसमधून तुम्ही महाबळेश्वरला सहज पोहोचू शकता, ज्यांचे भाडे 75 ते 250 रुपयांपर्यंत आहेत. येथून टेम्पो किंवा ऑटो-रिक्षामार्गे तुम्ही किल्ल्यावर पोहोचू शकतात.

प्रतापगड किल्ला कोणी बांधला?

शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला. या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून 3543 फूट आहे. 

प्रतापगड किल्ला का बांधला गेला?

मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराजांनी मोरापंत त्र्यंबक पिंगळे यांना त्यांचे पंतप्रधान नीरा आणि कोयना नद्यांच्या किनाऱ्याचे संरक्षण करण्यासाठी आणि पार खिंडीत संरक्षण करण्यासाठी या किल्ल्याची बांधणी करण्याचे काम दिले. ते 1656 मध्ये पूर्ण झाले. 

प्रतापगड किल्ला चढायला किती वेळ लागतो?

हा किल्ला महाबळेश्वरपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. येथे येण्यास तुम्हाला 40 मिनिटे लागतील. या किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्हाला 450-500 पायऱ्या चढणे आवश्यक आहे. 

कसे जावे

प्रतापगडाला जाण्यासाठी जवळचे ठिकाण - महाबळेश्वर, जिल्हा : सातारा.

उत्तर सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यात महाबळेश्वराच्या पश्चिमेस ८ मैलावर प्रतापगडाचा डोंगर आहे. पार आणि किनेश्वर या दोन गावांमधल्या डोपऱ्या नावाच्या एका टेंभावर या किल्ल्याची बांधणी झाली आहे. महाबळेश्वरहून महाडला जाणारी गाडी कुमरोशी गावाजवळ आली की तेथून अर्ध्या तासाच्या प्रवासात प्रतापगडला जाता येते.

अशा या जावळीच्या प्रांतात पायथ्यापासून प्रतापगड सुरू होतो. त्या गडाच्या खाली डाव्या हाताला एक पायवाट दिसते. दर्गा शरीफ म्हणजे अफजलखानाची कबर. या गडाला एकच महाद्वार आहे. त्याच्या खालच्या बाजूला वरून आलेले पाणी खाली लोटणारा पावसाळी ओढा आहे. थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर दरवाज्यात उभे राहता येते. दरवाज्याच्या आतल्या बाजूला द्वाररक्षकांची ठिकाणे दिसतात. हाबुरूज सोमसूत्री प्रदक्षिणा करून पाहता येतो.या ठिकाणी इतिहास अभ्यासक, शाळेच्या व महाविद्यालयाच्या सहली जातात. हे एक पर्यटकाचे आवडते ठिकाण आहे. दर वर्षी या ठिकाणी शिवप्रताप दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. प्रतापगड परिसर पाहत असताना आपणास इतिहासातील अनेक प्रसंग डोळ्यासमोर येतात .शूरता आणि गनिमीकावा व इतिहासातील शिवप्रतापाच्या अनेक गोष्टींची साक्ष आजही प्रतापगडावर गेल्यावर आपणास होते.जवळी खोरे कसे होते व आहे याचा उलगडा येथे गेल्यावरच होतो.

एकूण पृष्ठदृश्ये