नाव लोहगड उंची ३४२० फूट प्रकार गिरिदुर्ग चढाईची श्रेणी सोपी ठिकाण पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत जवळचे गाव लोणावळा,मळवली डोंगररांग मावळ सध्याची अवस्था व्यवस्थि
लोहगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ. स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
भौगोलिक स्थान
इतिहास
लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे. जवळच असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच इ.स.पू. २रे शतक या काळात किल्ल्याची निर्मिती झालेली असावी असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, यादव या राजवटी या किल्ल्याने पाहिल्या.
इ.स. १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकीच लोहगड हा एक. इ.स. १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुऱ्हाण निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. इ.स. १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड–विसापूर हा सर्व परिसरसुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला.
इ.स. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला.
पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती. इ.स. १७१३मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला. १७२० मध्ये आंग्ऱ्यांकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बांबळे याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. इ.स. १७८९ मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखीन मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला, त्याचा अर्थ असा-शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू – नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधिवली. नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुऱ्यांचे निगराणीत लोहगडावर आणले. १८०० मध्ये नित्सुरे कैलासवासी झाले व नंतर १८०२ मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला. पण नंतर दुसऱ्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. तेव्हा दुसऱ्या बाजीरावाने गडावरच्या मराठ्यांना गड रिकामा करायचा हूकुम सोडला अनिच्छेनेच मराठे मागे फिरले
किल्ल्यावर जाण्यासाठी असलेले ४ दरवाजे
महा दरवाजा :
महादरवाजा हे लोहगडाचे मुख्य दरवाजा आहे या दरवाज्याचे काम देखील नाना फडणवीसांनी करून घेतले आहे आणि या दरवाज्यावर हनुमानाच्या मूर्तीचे नक्षीकाम केले आहे.
गणेश दरवाजा :
किल्ल्यामध्ये जाण्यासाठी गणेश दर्वाज्याजाचा देखील उपयोग केला जायचा हा दरवाजा मध्यम आकाराचा असून दरवाज्याच्या आतल्या भागामध्ये दोन्ही बाजूला देवड्या आहेत. असे म्हणतात कि या दरवाज्याच्या डाव्या-उजव्या बुरुजांच्या बरोबर खाली सावळे कुटुंबाचा नरबळी दिला होता. गणेश दरवाज्याला गडाचा पहिला दरवाजा देखील म्हंटले जाते.
हनुमान दरवाजा :
हनुमान दरवाजा हा किल्ल्यामध्ये येण्यासाठी वापरला जाणार प्राचीन दरवाजा आहे.
नारायण दरवाजा :
नारायण दरवाज्यामधून हि किल्ल्यामध्ये प्रवेश करता येतो आणि हा दरवाजा इ. स. १७८९ मध्ये नाना फडणवीस यांनी बांधला होता आणि या दरवाज्याजवळ धान्य ठेवण्यासाठी भुयार बनवले होते.
किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे
महादेव मंदिर :
दर्ग्यापासून थोडे पुढे गेल्यानंतर दर्ग्याच्या उजवीकडे गेल्यानंतर एक सुंदर शिवमंदिर पाहायला मिळते.
शिवकालीन तोफा :
किल्ल्यामध्ये गणेश दरवाज्यातून आत गेल्यानंतर आपल्यला रिकाम्या जागेत ठेवलेल्या आणि मोडकळीस आलेल्या शिवकालीन तोफा पाहायला मिळतात.
लक्ष्मी कोठी :
ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटलेली त्यावेळी मिळालेली सर्व संपती लक्ष्मी कोठीमध्ये ठेवली होती आणि हि कोठी आज देखील आपल्यला पाहायला मिळते.
विंचूकडा :
लोहगडाच्या टोकावर गेल्यानंतर एक विंचवाच्या आकाराचा एक कडा पाहायला मिळतो तो म्हणजे विंचू कडा.
दर्गा :
आपल्याला किल्ल्याच्या महादरवाजाच्या आता गेल्यानंतर दर्गा पाहायला मिळतो.
१६ कोणी तलाव :
आपल्याला किल्ल्यावर एक सुंदर असा १६ कोणी तलाव देखील पाहायला मिळतो या तलावातील पाण्याचा उपयोग पूर्वी पिण्यासाठी आणि रोजच्या वापरासाठी केला जात होता.
गुहा :
आपल्यला गडावर ८० ते ९० लोक मावतील इतके मोठी गुहा पाहायला मिळते.
किल्ल्याच्या जवळील इतर आकर्षणे
भागा गुहा :
भागा गुहा हि किल्ल्यापासून २ ते ३ किलो मीटर अंतरावर आहे आणि हि गुहा पूर्वीच्या काळी बुध्द संतांचे घर होते.
आमी घाटी शहर :
आमी घाटी शहर हे लोणावळा गावापासून २२ ते २३ किलो मीटर अंतरावर आहे. आपण लोहगड हा किल्ला पाहायला गेल्यानंतर हे शहर देखील पाहू शकतो.
लोणावळा :
लोणावळा हे शहर एक प्रसिध्द पहाडी भाग आहे आणि हे किल्ल्यापासून २० किलो मीटर अंतरावर आहे.
लोहगड किल्ला पाहण्यासाठी कसे जायचे ?
- रेल्वे मार्गे : जर तुम्हाला हा किल्ला पाहण्यासाठी रेल्वे ने जायचे असेल तर तुम्ही पुणे किवा मुंबई मधून रेल्वे पकडून लोणावळा रेल्वे स्टेशनवर उतरू शकता आणि तेथून मावळ बस, स्थानिक रेल्वे पकडून जावू शकता.
- रस्ता मार्गे : किल्ल्यापर्यंत जाणारी कोणतीही थेट बस नाही त्यामुळे लोणावळा बस पकडून. लोणावळ्यामध्ये टॅक्सीने जावू शकता.
- विमानाने : लोहगडला जाण्यासाठी कोणतेही थेट विमानतळ नाही. या किल्ल्यापासुनाचे सर्वात जवळचे विमानतळ पुणे आहे आणि तेथून रेल्वे किवा बस पकडून लोणावळ्याला येवू शकतो.
गडावर जाण्याच्या वाटा
लोहगडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत. १) पुण्यावरून अथवा मुंबईवरून येतांना लोणावळ्याच्या शेजारच्या मळवली स्थानकावर पॅसेंजर गाडीने किंवा लोकलने उतरावे. तेथून एक्सप्रेस हायवे पार करून भाजे गावातून थेट लोहगडला जाणारी वाट पकडावी. वाट मोठी आणि प्रशस्त आहे.तिथून दीड तासांच्या चालीनंतर ‘गायमुख’ खिंडीत येऊन पोहचतो. खिंडीच्या अलीकडेच एक गाव आहे त्याचे नाव लोहगडवाडी. खिंडीतून उजवीकडे वळले म्हणजे लोहगडास आणि डावीकडे वळले म्हणजे माणूस विसापूर किल्ल्यावर पोहचतो. या मार्गे लोहगडावर प्रवेश करतांना चार दरवाजे लागतात.
२) लोणावळ्याहून दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने थेट लोहगडवाडीपर्यंत जाता येते. लोणावळा-भांगरवाडी-दुधिवरे खिंड-लोहगडवाडी. पवना धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर डावीकडे एक रस्ता लागतो तेथून ३ ते ४ किलोमीटरवर लोहगडवाडी आहे. उभा चढ आणि अतिशय धोकादायक वळणे आहेत. साधारण अर्धा तासाचा प्रवास आहे. मात्र येथे एस.टी. महामंडळाची सोय नाही. स्वतःचे वाहन असल्यास उत्तम अथवा लोणवळ्यातून ट्रॅक्सने जाता येते मात्र ट्रॅक्सभाडे १००० रु. आहे.
३) काळे कॉलनी ही पवना धरणाजवळ वसलेली आहे.तेथून लोहगड आणि विसापूर मधील गायमुख खिंड परिसर व्यवस्थित दिसतो.पवना धरणाच्या खालून एक रस्ता गायमुख खिंडीच्या डावीकडील टेक टेकडीवर जातो तेथून एक मळलेली पायवाट आपणास लोहगडवाडीत घेऊन जाते. या टेकडीवर अग्रवाल नावाच्या इसमाचा बंगला आहे. या वाटेने किल्ल्यावर जाण्यास २ तास लागतात. पुणे-पौड-कोळवण-तिकोना पेठ-दुधिवरे खिंड-लोहगडवाडी. तेथून अर्ध्या तासात लोहगड चढता येतो. वाटेत हडशीचा सत्यसाई आश्रम, प्रतिपंढरपूर हे देऊळ आणि पवना धरण बघता येते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा