सरनोबत नरवीर पिलाजीराव गोळे
स्वराज्याचे चे पायदळ प्रमुख, सरनोबत नरवीर पिलाजीराव गोळे !
जन्म
पिलाजीराव गोळे यांचा जन्म १६४० साली, गोळे गणी गावात, जावळी खोऱ्यात झाला.
स्वराज्य सेवेस सुरवात
छत्रपती शिवाजी महाराज यांनी जावळी आक्रमणं वेळी या मातब्बर घराण्याला कौल देऊन स्वराज्य मध्ये घेतलं, त्यावेळी गोळे घराण्यातील अनेक वीर स्वराज्यात दाखल झाले त्यापैकी एक सरनोबत पिलाजीराव गोळे
सरदार कानोजी जेधे यांच्यामार्फत स्वराज्य सेवेस सुरवात. प्रियंगुवाट म्हणजे आत्ताच पिरंगुट ला वास्तव्य,१६७४ साली पायदळ मधील सरदार म्हणून स्वतंत्र नियुक्ती.
अनेक धाडसी मोहिमांमध्ये पिलाजीराव गोळ्यांचा समावेश होता म ते शाहिस्तेखान चे प्रकरण असो ,अफजलखान वध अथवा सुरत लुटीचे प्रकरण असो
सुरत लूट लोहगड पासून राजगड पर्यंत पोहचवयला मोलाची मदत, त्या कामगिरीमुळे छत्रपती शिवाजी महाराज स्वतः पिरंगुटला वाड्यावर येऊन सन्मानित केले.
बुऱ्हाणपूर लुट
१६८१ साली ला बुऱ्हाण पूर लुटीत #धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या सोबत मोहिमेत सहभाग.
राजाराम_महाराज व पिलाजी गोळे
छत्रपती #राजाराम_महाराज यांना १६८९ ला रायगड ते प्रतापगड पर्यंत सुखरूप नेण्यास मोलाची साथ.
पार या प्रतापगड च्या पायथ्याशी कातर खान या मोगल सरदाराशी घनघोर युद्ध,छ. राजाराम महाराज्यांच्या नेतृत्वाखाली लढाईत सहभाग.
एकनिष्ठ म्हणून पिलाजी गोळे यांचं गौरव “पदती_सेनाधर” या अर्थात “पायदळ_प्रमुख” म्हणून गौरव करण्यात आला.
छत्रपती राजाराम महाराजांच्या नंतरही स्वराज्य वरील निष्टेत पिलाजीरावांनी भंग पडू दिला नाही.
१७०९ सालाचे छत्रपती शाहू महाराज यांचे एक पत्र मिळते त्यात पिसाळ देशमुख यांचा वाद पिलाजीराव गोळे यांना मिटवायाला सांगितले असा उल्लेख आढळतो.
अश्या प्रकारे छत्रपती घराण्याच्या ४ पिढ्यां सोबत इमानाने सेवा केलेले,हिंदवी स्वराज्य पायदळप्रमुख सरनोबत पिलाजीराव गोळे यांस मानाचा मुजरा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा