दुर्गभ्रमंती महिमानगड सहा महिन्यापूर्वी पाटण तालुक्यातील घेरा दातेगड/उर्फ सुदंरगड हि यशस्वीरित्या मोहीम केली.त्या नंतरचा पुर्ण वेळ कोरोना च्या पार्श्वभूमीमुळे लॉकडाउन च्या संपूर्णपणे काळात गेला.
त्यानंतर एकांतात बसुन पूर्व नियोजन पद्धतीने विचार केला कि बाहेरचं राहिलं आपल्या तालुक्यातील गड तरी भटकावे आणि त्यानुसार ठरल्याप्रमाणे दिनांक १८ जुलै २०२१ ला किल्ले महिमानगड हि मोहीम हाती घेतली . गडाची माहिती उपलब्ध केली सर्व सदस्यांना कळवले. पण कोणाचा प्रतिसाद मिळाला नाही शेवटी दोन मित्र आणि मी गडाच्या वाटेनं भ्रमंती करण्यासाठी निघालो. साधारण आमच्या घरापासून महिमानगड फक्त ३० कि.मी अंतरावर आहे पण दुर्दैव बघा गडाच्या पायथ्याशी पोहचलो तरि वाट मात्र मिळाली नाही मी बनवलेल्या नकाशा नुकसार असं होतं कि गडाच्या दरवाजा पर्यंत जाई दरवाजा दिसत नाही आणि प्रत्येकशात बघितले तर तसेच होत सुरवातीला गडाच्या पायथ्याशी गेलो शाळा होती समोरच एक मंदिर आहे डाव्या बाजुला पाठी लावली आहे महिमानगड प्रवेशद्वाराकडे जाणारा मार्ग त्याचं मार्गाने गेल्यावर गडाच्या सर्व बाजूंनी ढासळलेले बुरूज दिसले एक पायवाट होती तीनेचं सगळं वर गेलो समोरच एक झाड🌳 दिसले प्रवेशद्वार च्या भिंतीवर ते आडवे उगवले होते. समोरच एकदम पडक्या अवस्थेत प्रवेशद्वार आहे त्यावर हत्तीचे दोन जुने शिल्प कोरलेले आहे.
ऊजव्या बाजूस समोरच हनुमानाचे देऊळ दिसते. त्याच्या समोरच बुरुजावर जाण्यासाठी केलेल्या पायर्या दिसतात.येथून संपूर्ण गडाची तटबंदी नजरेस पडते. थोडे पुढे गेल्यावर खालच्या बाजूस पाण्याचे सुंदर तलाव आहे, तलाव बर्यापैकी खोल आहे. या तलावाला बारामही पाणी असते. त्याच्याच बाजूला वाड्यांचे ढासळलेले अवशेष दिसतात. या बांधीव तलावाच्या बाजूला एक मोठा खड्डा आहे, तो साच पाण्याचा तलाव असावा. या दोन तलावांच्या मधून वाट गडाच्या ईशान्येस असलेल्या सोंडेकडे जाते. या सोंडेवर असलेल्या तटबंदीमध्ये एक चोर दरवाजा आहे. या दरवाजातून पलिकडे गेल्यावर लांबवर पसरलेली सोंड दिसते. सोंडेच्या टोकाला एक बुरुज आहे. हे पाहून परत येतांना २ तलावांमधून न येता. किल्ल्याच्या रस्त्याकडील तटबंदीच्या बाजूने यावे, येथे तलावाच्या वरच्या बाजूस एक पीराचे थडगे आहे. येथून प्रवेशद्वारापाशी येऊन. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस गेल्यावर तटबंदी व बुरुजांचे अवशेष पाहायला मिळतात. येथील तटबंदीवरुन खालचे महिमानगड गाव दिसते. गड फिरण्यास साधारण दोन तास वेळ. लागतो. वर्धनगड, ईशान्येकडे असणारा मोळ घाट असा सर्व परिसर दिसतो.
📜गडाचा इतिहास📜
गडाची उंची :- ३२०० फुट उंच आहे
गडाचा प्रकार :- गिरिदुर्ग
गडाचे ठिकाण:- सातारा जिल्हा माण तालुका
जवळचे गाव :-दहिवडी पुसेगाव
महिमानगड -
डोंगररांग-
आदिलशहाच्या काळात विजापूर या राजधानीपासून कोकणातल्या बंदरांपर्यंत जाणारा, विजापूर - पंढरपूर - सातारा - वाई - महाड असा व्यापारी मार्ग होता. या मार्गाचे रक्षण करण्यासाठी महिमानगड किल्ल्याची योजना केली होती. साताराच्या पूर्वेकडील प्रांताचे संरक्षण करण्याकरीता शिवरायांनी जे किल्ले घेतले, त्यापैकीच एक महिमानगड. पूर्वी किल्ल्याच्या रक्षणाकरीता महार रामोशी मिळून ७५ इसम ठेवलेले होते. किल्ल्याचे हवालदार आणित्यासोबत सबनीस यांची इनामे अद्यापही वंशज पाटील व कुलकर्णी यांच्याकडे चालू आहे होते.
गडावर जाण्याच्या वाटा
१) दहिवडी ते बिदाल अणि त्यानंतर महिमानगड.
२) सातारा ते पंढरपूर हायवे वरुन
महिमानगड गावतून गडावर.
राहण्यासाठी सोय
गडावर राहण्याची सोय नाही पण महिमानगड गावात शाळेमध्ये होऊ शकते
गडावर पाण्याची सोय आहे
आपल्याकडे सर्व साहित्य असेल तर गडावर राहु शकता पण शाळा हा उत्तम पर्याय आहे.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही, दहीवडी व महिमानगड गावात जेवणाची सोय होते.
सुचना जर आपले समवेत वाहन असेल तर माण तालुक्यातील तिन्ही ठिकाणे तुम्ही पाहु शकता.
महिमानगड २) शिखर शिंगणापूर ३) गोंदवलेकर महाराज समाधी..
*गड भ्रमंती नंतर जी माहिती उपलब्ध झाली त्या नुसार लेख लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
काही चुकले असेल तर तसद्दी बद्दल क्षमस्व*
संदर्भ:- ट्रेक क्षीतिझं
धन्यवाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा