गडगणपती

 

"पन्हाळगडावरील बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारामधील गणपती"

                 दख्खन दौलत म्हणून ओळखला जाणारा किल्ले पन्हाळगड कोल्हापूर शहराच्या वायव्येला अवघ्या २० किमी अंतरावर आहे. किल्ल्यावर शिलाहार, यादव, बहामनी, आदिलशाही यापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत अनेक राजवटींनी आपले सत्ताकेंद्र निर्माण केले. या राजवटींच्या काळात गडावर अनेक इमारती व मंदिरे बांधण्यात आली. ती आजही भक्कमपणे उभी असलेली पाहायला मिळतात. 

              सर्वसामान्य पर्यटक पन्हाळगडावर आल्यानंतर अंधारबाव, तीन दरवाजा, सज्जाकोठी, बालेकिल्ल्यातील धान्य कोठारे पाहून परतीच्या प्रवासाला निघतो. पण या धान्यकोठारांजवळ महाराजांच्या वाड्याचे अवशेष असून हा गडावरील बालेकिल्ल्याचा भाग आहे. राजवाड्या जवळ शंभू महादेवाचे मंदिर आहे. पूर्वी किल्ले पन्हाळगडाच्या बालेकिल्ल्यामध्ये येण्यासाठीचा मार्ग हा हुजूर गल्लीतून होता तो आजही आहे. येथे मध्यम आकाराचे भक्कम प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारावर उजव्या सोंडेचा पद्मासनात बसलेला सिद्धिविनायक गणपती पाहायला मिळतो. जवळ हनुमानाची मूर्ती आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

एकूण पृष्ठदृश्ये