दुर्गसेवा

                                             सह्याद्री प्रतिष्ठान 

घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा.


#सह्याद्री 

महाराष्ट्राच्या पावन पुण्यभूमीला लाभलेला अनमोल नैसर्गिक दागिना. दिसायला अगदी राकट, कणखर. अन् याच सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात शेला पागोटं चढवून, भगवा जरी पटका तटा बुरजांच्या मुठीत धरून उभे आहेत ते #गडकोट. 


छत्रपती शिवाजी महाराजांच्या अन् आपल्या बापजाद्यांच्या अतुलनीय पराक्रमाची यशोगाथा सांगणारी सुवर्णशिल्प... 

होय #सुवर्णशिल्पच... 

या गडकोटांच्या अंगी असलेल्या अभ्येद्यपणा, बेलाग, बुलंदपणा महाराजांनी अचूक ओळखला, अन् मग एकेक गड सजू लागला. महाराजांनी अगदी जिवाच्या पलीकडे जपलेत हे गडकोट. मावळ्यांनी तर अगदी मरणालही ताटकळत ठेवून हे गडकोट राखलेत. 

याच पराक्रमी मावळ्यांचा अन् छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारी आपण लेकरं आहोत. मग ह्या गडकोटांचं अडगळीत जगणं कस मान्य होणार ना ? 

याच उद्देशातून उभं राहिलं 

#गडकोटांचे_अधिष्ठान 

#सह्याद्री_प्रतिष्ठान

अन् त्यातूनच सुरू झाला ह्याच पवित्र गडकोटांच्या संवर्धन कार्याचा प्रवास...


#आम्ही_फक्त_बोलतच_नाही

फक्त जयंती आली की झेंडे मिरवणारे आम्ही नाहीत.

आपला ऐतिहासिक वारसा आपल्या पुढच्या पिढीला दाखवायचा असेल तर तो आपणच टिकवू शकतो. हेच तत्त्व डोक्यात घेऊन गेली 14 वर्ष आम्ही सह्याद्रीचे दुर्गसेवक काम करतोय.

दुर्गसंवर्धन कार्यात सहभागी किंवा सहकार्य करण्यासाठी संपर्क

8208062083

दुर्गसेवक नोंदणी

एकूण पृष्ठदृश्ये