
गुणक : 18.276°N 73.613°E
नाव : तोरणा
उंची : १४०३ मीटर/४६०४ फूट
प्रकार : गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी : मध्यम
ठिकाण : वेल्हे तालुका, पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव : वेल्हे
डोंगररांग : सह्याद्री
सध्याची अवस्था : चांगली
स्थापना : १४७० ते १४८६तोरणा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री पर्वतरांगांमधील डोंगरी किल्ला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीच्या काळात जे किल्ले घेतले त्यामधील एक म्हणजे तोरणा किल्ला. तोरणा, रायगड आणि राजगड हे किल्ले एकाच पर्वत रांगेमध्ये आहेत त्यामुळे प्रत्येक किल्ल्यावरून यामधील २ किल्ल्यांचे दर्शन आपल्यला होतेच. तोरणा हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून हा किल्ला सह्याद्रीच्या पर्वत रांगेमध्ये वसलेला आहे. या सह्याद्री डोंगर रांगा ह्या दोन बाजूस पसरल्या आहेत एका बाजूस तोरणा किल्ला वसलेला आहे आणि दुसऱ्या बाजूस भुलेश्वर रांगा पसरल्या आहेत. तोरणा हा किल्ला पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच डोंगरावर असल्यामुळे या किल्ल्याला पूर्वीच्या काळी प्रचंडगड म्हणून देखील ओळखले जात होते. या किल्ल्याला स्वराज्याचा शिलेदार म्हणून देखील ओळखले जाते कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सोबत्यांसोबत आणि मावळ्यान सोबत रायेश्वर मंदिरामध्ये स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा तोरणा हा किल्ला जिंकला आणि स्वराज्याचे तोरण बांधले.
तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत, त्यापैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत. दुसऱ्या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात. पुण्याच्या नैर्ऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये १८.२७६ उत्तर अक्षांश व ७३.६१३ पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे. या गडाच्या दक्षिणेला वेळवंडी नदी असून उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. या गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत. पुण्यापासून रस्त्याने तोरण्यापर्यंतचे अंतर ६० कि.मी. आहे.
इतिहास
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना इ.स. १६४७ मध्ये सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला आहे . छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आले. महाराजांनी गडाची पहाणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नांव बदलून 'प्रचंडगड' असे ठेवले. या किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग शिवाजी महाराजांनी राजगडाच्या बांधणीसाठी केला.
तोरणा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरून हा शैवपंथाचा आश्रम असावा. इ. स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो शिवाजी महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले आणि गडावर काही इमारती बांधल्या. महाराजांनी आग्ऱ्याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात ५ हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांची निर्घृण हत्या झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इ. स. १७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महाराजांकडेच राहिला होता. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय. तोरणा गडावर मेंगाई देवीचे प्राचीन मंदिर आहे.
किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे
तोरंजई देवी मंदिर :
कोठी दरवाज्य समोर आपल्याला जे छोटेशे मंदिर पाहायला मिळेल ते मंदिर म्हणजे तोरंजई देवी मंदिर. ज्यावेळी तोरणा हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डाकडूजी करण्यासाठी कामगार नेमले. ते कामगार काम करत असताना त्यांना सोन्याच्या मोहरानी भरलेले २२ हंडे सापडले त्याच ठिकाणी हे तोरंजई देवीचे मंदिर बांधण्यात आले.
झुंजार माची :
नवरात्रोत्सवाच्या वेळी वेल्हे गावचे लोक गडावर देवीचा नवरात्र उत्सव साजरा करतात. मेंगाई देवी मंदिर ते झुंजार माची या मार्गावर हनुमान बुरुज, भेळ बुरुज, सफाली बुरुज, मलेचा बुरुज, फुटक बुरुज आणि लकरखाना या मार्गावर आहेत. झुंजार माची हि हनुमान बुर्जाच्या जवळून मेंगाई देवीच्या मंदिराच्या बाजूने दिंडी दरवाज्याच्या खाली आल्यानंतर आपल्याला झुंजार माची पाहायला मिळते.
झुंजार माची कडे जाणारा मार्ग हा सोपा नाही आणि पावसाळ्याध्ये या ठिकाणी जाने खूप धोकादायक असते आणि पावसाळ्यामध्ये या माचीवर दाट धुकं देखील पहला मिळते पण येथे जाने पावसाळ्यामध्ये धोकादायक आहे पण आपण उन्हाळ्यामध्ये गडावरील हा भाग पाहू शकतो.
मेंगाई देवी मंदिर :
तोरणा किल्ल्यावर आपल्याला मेंगाई देवीचे मंदिर देखील पाहायला मिळते. रात्रभर मुक्काम करणारे किल्ला प्रेमी या ठिकाणी मुक्काम करू शकतात त्याचबरोबर वेल्हे गावामधील लोक नवरात्रोत्सव या मेंगाई देवीच्या मंदिरामध्ये साजरा करतात.
बुरुज :
आपण पहिलेच असेल कि प्रत्येक किल्ल्यावर बुरुज हा असतोच कारण हे बुरुज शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेले असतात आणि या गडावर देखील आपल्याला बुरुज पाहायला मिळतात आणि ते म्हणजे हनुमान बुरुज, सफेली बुरुज, भेळ बुरुज आणि फुटा बुरुज.
तोरनेश्वर मंदिर :
तोरनेश्वर मंदिर हे एक महादेवाचे मंदिर होते पण आपल्याला आज मेंगाई देवीच्या मंदिराच्या आजूबाजूला मोडलेले अवशेष दिसताच ते तोरनेश्वर मंदिराचेच आहेत.
बुधाळा माची :
तोरणा किल्ल्याच्या पश्चिमेला बुधाळा माची पाहायला मिळते आणि या माचीच्या शेवटी पायरे दरवाजा आहे तेथून आपल्यला किल्ल्याकडे जाता येते तसेच बुधाळा माचीवरून भगत दरवाज्याचा रस्ता लागतो आणि या भागात दरवाज्यातून राजगडावर जाण्यासाठी मार्ग आहे.
गडावरील दरवाजे :
गडावर आपल्याला वेगवेगळे दरवाजे पाहायला मिळतात ते म्हणजे कोकण दरवाजा, पायरे दरवाजा , दिंडी दरवाजा आणि भगत दरवाजा.
बालेकिल्ला :
बालेकिल्ला हा तोरणा किल्ल्याचा उच्चतम बिंदू आहे. बुढाला माची परिसरातील सह्याद्रीच्या सौंदर्याने पाहिल्यानंतर, मेंगाई देवीच्या मंदिराकडे परत जाताना बालेकिलाचे अवशेष दिसतात. गडापासून किल्ल्याचे मोठे विस्तार दिसते. वास्तविक शिवाजी महाराजांनी या विस्तारातून किल्ल्याचे नाव “प्रचंडगड” ठेवले.
पुणे व आसपासच्या भागातील पर्यटक सुट्टीच्या दिवसात तोरणा किल्ल्यावर भेट देण्यासाठी येतात. सह्याद्री पर्वत रांगेत असलेल्या या गरुडाच्या घरट्याला भेट देणाऱ्या पर्यटकांनी निसर्गाच्या सौंदर्याचा दृष्टीकोन सांभाळताना त्यांच्या सुरक्षेकडे लक्ष केंद्रित करुन फार उत्साही न होता किल्ला पाहण्याची गरज आहे. कारण पुणे जिल्ह्यातील इतर किल्ल्यांच्या तुलनेत तोरणा किल्ला चढणे अवघड आहे.
गडावर जाण्याचा मार्ग
पुणे जिल्ह्यातील वेल्हे हे तालुक्याचे गाव तोरणाच्या पायथ्याशी आहे. पुणे-वेल्हे अंतर ६० कि.मी आहे. पुणे-नसरापूर-वेल्हे, पुणे-पानशेत-वेल्हे व पुणे-खानापूर-पाबे मार्गे वेल्हे अशा मार्गांनी तोरणा गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. शिवाजी महाराजांच्या काळातील वेल्हे-वेग्रे आळीमार्गे पाऊलवाटेने दीड-दोन तासात बिनी दरवाजातून तोरण्यावर जाता येते. हा मार्ग इतर मार्गांपेक्षा सोपा आहे. अवघड ठिकाणी पुरातत्त्व खात्याने लोखंडी संरक्षक कठडे बसवले आहेत. त्यामुळे सहज चढउतार करता येते. दुसरा मार्ग वेल्ह्यापासून ५ कि.मी अंतरावर असलेल्या भट्टी या गावातून आहे. गावाच्या पश्चिमेकडून वाळणजाई दरवाजातून बुधला माचीवर थेट वाट जाते. या वहिवाटीच्या वाटांशिवाय चोरवाटेने येणारे अन्य मार्ग अडचणीचे आणि धोकादायक बनले आहेत. वेल्हे गावातून चढताना दिसणारा तोरणा आणि गुंजवण्याकडून दिसणारा राजगड यात बरेच साम्य आहे.
तोरणा किल्ला अडचण पातळी आहे का?
ट्रेक मार्ग अनुसरण करणे खूप सोपे आहे परंतु शेवटच्या काही विभागांमध्ये थोडे कठीण आहे. जर तुम्ही पार्किंग पर्यंत गाडी चालवली तर तुम्ही ट्रेकिंगच्या वेळेच्या सुमारे 25% वाचवाल. पार्किंग पासून, गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी 2 तास लागतील.
तोरणा किल्ल्यावरुन खाली येण्यासाठी किती मार्ग आहेत?
तोरणा किल्ला किंवा प्रचंडगड (म्हणजे प्रचंड किल्ला) पुण्यात आहे. टेकडीची उंची समुद्रसपाटीपासून 1,403 मीटर (4,603 फूट) आहे, ज्यामुळे तो पुण्यातील सर्वात उंच डोंगर-किल्ला बनला आहे. वेल्हे बेस गावात जाण्यासाठी 2 मार्ग आहेत.
तोरणा किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर मराठा ध्वज कोणी फडकवला?
पौराणिक कथेनुसार, हा फक्त दोन मराठा किल्ल्यांपैकी एक आहे जिथे शिवाजी महाराजांनी वैयक्तिकरित्या भगवा ध्वज फडकवला. दुसरा किल्ला तोरणा आहे. विजयदुर्ग किल्ल्याला “पूर्वेकडील जिब्राल्टर” असे म्हटले गेले कारण ते अक्षरशः अभेद्य होते. (Torna Fort Information In Marathi) त्याच्या स्थानिक फायद्यांमध्ये 40 किमी लांब वाघोटन/खरेपाटन खाडीचा समावेश आहे.
टीप:
तोरणा हा किल्ला पाहण्यासाठी कोणताही शुल्क घेतला जात नाही.
हा किल्ला २४ तास उघडा असतो.
तोरणा हा किल्ला पाहण्यासाठी ३ ते ४ तास लागतात.