शंभुगाथा

 

मुरुड जंजिरा वरील आक्रमण

ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्राने लंकेवर स्वारी करण्यासाठी रामसेतू बांधला, त्याप्रमाणे उसळत्या सागरामध्ये ८०० मीटरचा सेतू संभाजी महाराजांनी बांधला. जंजिरा ९०% नेस्तानाबूत केला होता.      
जंजिरा किल्ला हबशी सिद्धी बंधूंच्या ताब्यात होता. या वेळी जंजीर्यावर सिद्दी खैरत खान, सिद्दी कासम खान होते. हे आफ्रिकेतून आलेले हबशी होते. हे हबशी जंजीऱ्यातून बाहेर यायचे, तटावरची माणसे पकडायचे, त्यांचे कान नाक कापायचे. कोकणातील बायका पाळावयाचे. या जाचाने त्रासलेले लोक शंभूराज्याकडे आले, आपले संकट त्यांनी राजांना सांगितले. हे सगळे भयानक प्रकार ऐकून संभाजी राजे खूप क्रोधीत झाले.
त्यांनी जंजिरेकर सिद्धांच्यावर आक्रमण करण्याचे ठरवले. पण त्यांना माहित होते कि जंजिरा सरळ लढाईत जिंकणे अवघड होते, कारण खवळलेला समुद्र त्या जंजिर्याच्या मदतीला होता. त्यामुळे राजांनी ठरवले कि या जंजिराच्या पोटात घुसून त्याचा कोथळा बाहेर काढला पाहिजे.    
याच बेतासाठी त्यांनी बोलावणे धाडले कोंडाजी फर्जद याला. कोण होता हा कोंडोजी फर्जद ? हा होता हिरोजी फर्जदांचा मुलगा. आग्रा भेटीत शिवाजी महाराजांचे सोंग घेवून झोपलेले हिरोजी. संभाजी राजांनी कोंडोजी च्या कानात आपला बेत सांगितला. आणि मग निघाला कोंडाजी. आपल्या सोबतीला ४० / ५० मावळे घेवून निघाला. आणि थेट जंजिऱ्याच्या सिद्धी समोर आला, आणि त्याने सिद्धी ला त्याची चाकरी स्वीकारण्याची इच्छा सांगितली. सिद्धी ला आश्चर्याचा धक्का बसला. तो आनंदून गेला. कारण शंभू राजांचा एक शूर मावळ त्यांना येवून मिळाला होता. सिद्धी ने त्याला आपली चाकरी दिली. आणि मग काय, कोंडाजी सिद्धी ची  सेवा करू लागला. पण त्या कोंडाजी च्या काळजात वेगळाच डाव होता, त्याच्या शंभू राजांचा. कोंडाजी चे मन मात्र शंभू राज्यांकडे होते.
संभाजी महाराजांनी कोंडाजी ला सांगितलेला डाव असा होता कि जंजीऱ्याचा सगळा दारू गोळा उडवून द्यायचा. आणि याच धाडसी डावासाठी त्यांनी कोंडाजी आणि काही निवडक मावळ्यांना जंजीऱ्यात  पाठवले होते.    
दिवस ठरला, सुरुंग पेरले गेले, कोंडोजी फर्जदांचे साथीदार दर्यात गलबते घेवून उभे होते. कोंडोजीची बायको सुद्धा बरोबर निघाली, पण तिचा एक आग्रह होता, तिची एक दासी होती, त्या दासीला बरोबर घेण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. कोन्डोजीकडे वेळ नव्हता, त्याने बायकोची मागणी मान्य केली,मग ती दासी पण बरोबर निघाली. मात्र ती दासी म्हणाली कि मी माझे कपडे व काही समान बरोबर घेवून येते. ती दासी कपडे आणायला म्हणून गेली आणि ती थेट सिद्धी च्या दरबारा कडे गेली. सिद्धी ला तिने मराठ्यांचा डाव सांगितला. मग मात्र कोंडाजी सापडले आणि मारले गेले, जंजीऱ्या वरचे सगळे मराठे कापले गेले.
पण त्यातला एक मराठा सरदार कसाबसा वाचला होता. त्याने जंजीऱ्या वरून खवळलेल्या समृद्रात उडी मारली आणि आपला जीव मुठीत घरून किनार्याच्या दिशेने पोहू लागला. कशासाठी ? जीव वाचवण्यासाठी नाही. तो पोहोत होता संभाजी राजांना घडलेल्या दुखःद घटनेची माहिती देण्यासाठी. कारण संभाजी महाराज वाट बघत होते कोंडोजी चा डाव यशस्वी होण्याची. अखेरीस तो मावळा किनाऱ्यावर पोहोचला. त्याने घडलेली हकीकत शंभू राजांना सांगितली. तसा शंभू राजांना फार मोठा धक्का बसला. कोंडोजी फर्जद हा एक शूर आणि थोर सरदार तर होताच पण त्यांना खूप जवळचा होता. राजांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. पण राजाला भावनाविवश होवून चालत नाही. शंभू राजांनी ठरवले कि कोंडोजी चे बलिदान सार्थकी लावायचे. त्यांनी वीस हजाराची सेना आणि तीनशे गलबते घेवून राजांनी जंजीऱ्यावर आक्रमण केले. आणि मग कडाडले संभाजी राजे, “डागा तोफा किल्ल्यावर.” मग मात्र किनाऱ्यावरून संभाजी महाराजांच्या तोफांचा मारा सुरु झाल्या. मराठ्याच्या तोफा आग ओकू लागल्या. मराठ्यांच्या तोफांचे गोळे किल्ल्यावर पोहोचत होते. सिद्धीचा शिशमहाल चकणाचुर झाला होता. पण ऐन वेळी समुद्र जंजिऱ्याच्या मदतीला आला. समुद्राला भरती आली. मावळे मागे सरू लागले. पण शंभू राजे थांबले नाही. त्यांनी ठरवले कि समुद्रात सेतू बांधायचा. काम सुरु झाले, सेतू आकार घेवू लागला. मराठ्यांच्या तोफांचा सुरु होताच.
पण मग मात्र औरंगजेबाने डाव साधला, त्याला कळून चुकले कि जर जंजिरा मराठ्यांच्या हाती लागला तर समुद्रावर संभाजी राज्याची सत्ता येईल. औरंग्याने हसन आली नावाच्या सरदाराला स्वराज्यावर चाल करून पाठवले. हसन अली हा औरंगझेबाचा सरदार ४० हजाराची फौज घेवून कल्याण-भिवंडी च्या मार्गे रायगड च्या दिशेने येवू लागला होता.
त्यामुळे नाईलाजास्तव ती मोहीम अर्धवट ठेवून महाराजांना स्वराज्याच्या रक्षणासाठी रायगडाकडे परत फिरावे लागले

बुऱ्हाणपूर वरील छापा

२८ जानेवारी १६८१

शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा टाकला हे आपल्याला माहित आहे , दोनदा टाकला हेही आपल्याला माहित आहे. त्याच प्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या बाहेर जावून मध्य प्रदेशातल्या बुऱ्हाणपूर वर छापा टाकला . 

उत्तरेकडील आग्रा आणि दिल्ली हि शहरे म्हणजे मोगलांची सर्वात मोठी वैभवनगरे. पण यानंतर बुऱ्हानपूर हि मोगलांची एक मोठी वैभवनगरी होती. तिची दुसरी ओळख म्हणजे “दक्षिणेचे प्रवेशद्वार”. भारतातली एक मोठी बाजारपेठ होती.

राज्याभिषेक १६ जानेवारी १६८१ ला झाला आणि लगेच १४ व्या दिवशी छापा टाकला.

रायगड ते बुऱ्हाणपूर हे १०००किमी पेक्षा जास्त अंतर आहे . परंतु फक्त ४ ते ५ दिवसा मध्ये संभाजी महाराज बुऱ्हाणपूर ला पोहोचले .

आणि १ करोड होनांची दौलत स्वराज्यात आणली

औरंगजेबाचे आक्रमण

शिवाजी महाराजांच्या निधना नंतर मुगल बादशाह औरंगजेब स्वतःच स्वराज्यावर चालून आला होता.

१६८० मध्ये दिल्लीचा पातशहा, औरंगजेब महाराष्ट्रावर ५ लाखाची सेना घेवून चालून आला.

त्यावेळी संभाजी महाराजांचे वय फक्त २३ वर्ष होते

औरंजेबाची हा सेनासागर मराठ्यांच्या सैन्य संखेच्या दहा पट होता.

५ लाखांचे सैन्य, १४ कोटी खजिना, ४० हजार हत्ती, ७० हजार घोडे, ३५ हजार उंट. इतका अफाट सैन्यासागर होता कि औरंगजेबाची छावणी ३ मैलांपर्यंत पसरायची.

काही दिवसातच महाराष्ट्र आणि दख्खन जिंकून घेणार अशी अशा बाळगून आलेल्या या दिल्लीकराला संभाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी ७ वर्ष जुंझत ठेवला.

जोपर्यंत संभाजी महाराजांना कैद करणार नाही तोपर्यंत डोक्यावर मुकुट (शाही पगडी) घालणार नाही असा प्रणच त्याने केला होता.

नाशिक जवळचा रामशेज हा किल्ला तर फक्त ६०० मावळ्यांनी जवळपास ६ वर्ष अजिंक्य ठेवला होता.

रामशेज किल्ला

नाशिक जवळ पिंडोरी पासून १० मैलाच्या अंतरावर रामशेज नावाचा किल्ला आहे. प्रभू श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला जायचे, आणि तिथे त्यांची शेज आहे म्हणून या किल्ल्याला रामशेज असे नाव पडले. सिंहगड, प्रतापगड असे सह्याद्रीच्या रांगेतील बरेचसे  किल्ले  घनदाट  जंगलात  आहेत, डोंगर  दऱ्यांमध्ये वसलेले आहेत. परंतु रामशेज हा किल्ला एका सपाट आणि मोकळ्या  मैदानावर आहे. किल्लाच्या जवळपास झाडी, जंगल देखील नव्हते. डोंगर दऱ्यादेखील नव्हत्या. रामशेज किल्ल्याजवळचा एकमेव किल्ला म्हणजे त्र्यंबकगड परंतु तो देखील ८ कोस अंतरावर होता. हि सर्व परिस्थिती पाहता किल्ला अगदी एकाकी होता. 

शहाबुद्दीन खान 

ह्याच किल्ल्यावर चांदसितारा  फडकवावा आणि त्या नंतर त्र्यंबक, अहिवंत, मार्कंडा, साल्हेर असे किल्ले जिंकून घ्यावेत असा औरंगजेबाचा मनसुबा होता. औरंगजेबाने आपला सरदार शहाबुद्दीन खान याला हा किल्ला जिंकण्यासाठी पाठवले. शहाबुद्दीन किल्ला घेण्यासाठी चालून आला. त्याच्या सोबत १० हजाराची फौज होती आणि अफाट दारुगोळा आणि तोफा होत्या. त्यामुळेच औरंगजेबाच्या सरदाराला वाटले कि हा किल्ला आपण ताबडतोब काबीज करू. त्याने औरंग्याला सांगितले होते कि, मी एक  दिवसात किल्ला घेतो म्हणून.

किल्ल्यावर फक्त ६०० मावळे होते. किल्ल्यावर सूर्याजी जेधे नावाचे किल्लेदार होते. हे मुळचे मावळातले. ते धाडसी, हट्टेकट्टे आणि पराक्रमी होते. सूर्याजी जेधे रामशेज च्या तटावरून फिरत राहायचे. दिवसा आणि रात्रीही. ते कधी झोपायचे हेच कोणाला माहित नव्हते. किल्ल्यावर तोफा नव्हत्या.

संभाजी राजांनी स्वतः लक्ष घालून प्रत्येक किल्ल्यावर मुबलक प्रमाणात दारुगोळा उपलब्ध करून ठेवला होता. किल्ल्यावरच्या किल्लेदाराने आणि मावळ्यांनी लाकडाच्या तोफा बनवल्या. लाकडाच्या तोफांना जनारावरांचे कातडे लावून तोफा बनवल्या. आणि किल्ल्यावरून खाली तोफगोळ्यांचा मारा सुरु केला. या आक्रमणाने शहाबुद्दीन खान पार गांगारून गेला. ५ महिने झाले पण तरीही किल्ल्या काही जिंकता आला नाही.    

मोगलांचे तोफगोळे किल्ल्यावर पोहोचत नव्हते, पण किल्ला तर जिंकायचा होता. मग त्याने आपल्या सैनिकांना आजूबाजूच्या जंगलातील झाडे तोडायला सांगितली. सगळी लाकडे जमा केली. आणि लाकडी बुरुंज बनवला (याला लाकडी दमदामा असेही म्हणतात) तोही इतका उंच कि किल्ल्याच्या उंचीचा. हा लाकडी बुरुंज कशासाठी ? तोफा या लाकडी बुरुंजावर नेवून ठेवायच्या आणि मग तिथून किल्ल्यावर तोफा डागायच्या. ५० तोफा आणि ५०० सैनिक बसतील एवढा मोठा बुरुंज बनवला. या लाकडी बुरुंजावरून मोगल सैनिक किल्ल्यावर तोफांचा मारा करू लागले. मराठे सुद्धा या लाकडी बुरुंजावर तोफगोळे डागत होते. मोठे घनघोर युद्ध चालू होते. मराठे मागे सारायला तयार नव्हते. शहाबुद्दीन च्या हाती यश येत नव्हते.

२ वर्षे झाली, इतके करूनही रामशेज किल्ला अजिंक्यच राहिला.    

फतेह खान

मग मात्र औरंग्या ने शहाबुद्दीन ला परत बोलावून घेतले. त्याने रामशेज ची हि मोहीम सोपविली फतेह खान नावाच्या जिगरबाज सरदारावर. आणि मग फतेह खान २० हजारीची फौज घेवून आला. आणि त्याने रामशेज वर जोरदार आक्रमण चढवले. पण तरीही मराठे काही माघार घेईनात. मोगल सेना किल्ल्याच्या जरा जरी जवळ आली तरी किल्ल्यावरून मावळ्यांच्या गोफणीतून धडाधड दगड गोटे सुटायचे, हे दगड इतके जोरात यायचे कि बरेचसे सैनिक जागेवरच ठार  व्हायचे. त्या फतेह खानाला मावळे तसूभरहि पुढे सरकू देईनात. फतेह खानच्या सैन्याला सळो कि पळो करून सोडले या मरहट्ट्यान्नी. इतका खटाटोप करूनही किल्ला काही शरण येईना. फतेह खान हाती फक्त निराशा अपमान आणि माघारच आली.

फतेह खानाच्या तोफांचे गोळे शक्यतो किल्ल्यावर पोहोचत नव्हते, पण त्यातूनही एखादा तोफगोळा किल्ल्यापर्यंत पोहोचत असे. त्या तोफ्याच्या गोळ्यामुळे किल्ल्याच्या तटबंदीची किंवा एखाद्या बुरुंजाची पडझड होत असे. ते पाहून फतेह फार खुश व्हायचा. पण रात्र सारून सकाळ झाली कि ती पडझड झालेली तटबंदी किंवा बुरुंज परत बांधून झालेला असायचा. ते  दृश्य पाहून फतेह खान  आश्चर्यचकित व्हायचा मग मात्र त्याचा राग अनावर होत होता. किल्ल्यावरचे मावळे, लहान मोठी सगळी माणसे अपार कष्ट करून एका रात्रीतच हि पडलेली तटबंदी पुन्हा बांधून काढायचे. परंतु फतेह खानाला मात्र वेगळाच संशय यायला लागला, त्याला वाटू लागले कि या मरहट्ट्यानां जादूटोना येतो, भुताटकी येते, आणि म्हणूनच संध्याकाळी पडलेली तटबंदी सकाळपर्यंत परत आहे तशी सुस्थितीत असायची.    

अनेक महिने सरले, हजारो मुगल सैनिक मारले गेले, खुपसारा दारुगोळा हकनाक वाया गेला, तरीही किल्ला हाती यायचे नाव नव्हते. मग एके दिवशी फतेह खानच्या एका सरदाराने फतेह खानाला सांगितले कि युद्ध तर करून बघितले, आता एका मांत्रिकाला बोलावून बघा. फतेह खान ला हे पटले नाही, पण किल्ल्या जिंकण्यासाठी तो काहीही करायला तयार होता. मग त्याने आपल्या सरदारा कडून मांत्रिकाला बोलावून घेतले. मांत्रिक आला, तो फतेह खान ला म्हणाला, “हुजूर, चिंता मत करो, मैने तो भूत प्रेत भी वश किये है, ये मरहट्टे क्या चीज है? आप बस मुझे एक सोने का नाग दे दिजीये बाकी मी संभाल लेता हु”  मग त्या मांत्रिकाने मागितल्या प्रमाणे त्याला सोन्याचा नाग बनवून देण्यात आला.

मांत्रिकाने तो सोन्याचा नाग आपल्या छातीजवळ धरला आणि किल्ल्याच्या मागच्या बाजूने किल्ल्या जवळ जायला निघाला. मांत्रिक पुढे आणि फतेह खानाचे  सैन्य त्याच्या मागे. मांत्रिक किल्ल्याचे दिशेने पुढे सरकत होता. तो जसा किल्ल्याच्या जवळ आला तसा किल्ल्या वरून गोफणीचा एक दगड जोरात मांत्रिकाच्या अंगावर आला. त्याचा तडाखा इतका जोरदार होता कि नाग एकीकडे आणि मांत्रिक दुसरीकडे जावून पडला. फतेह खान चे सैन्य पाठीला पाय लावून छावणीच्या दिशेने जोरात पळत सुटले.

फतेह खानने अजून एक डाव आखला, त्याने मध्य रात्रीच्या वेळी किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याच्या दिशेने तोफांचा जोरदार मारा सुरु केला. या तोफांचा आवाज खूप जबरदस्त होता. त्या आवाजाने किल्ल्यावरचे सगळे मावळे मुख्य बुरुंजाजवळ येवून फतेह खानची करामत बघत होते. पण किल्ल्यावर एक पण तोफ गोळा पोहोचत नाही हे पाहून त्यांना हसू येत होते. जवळपास सगळ्या तोफा किल्ल्याच्या दिशेने आग ओकत होत्या. पण फतेह खान मात्र त्या तोफांच्या जवळ नव्हताच. कारण तो होता एका वेगळ्याच बेताच्या तयारीत. त्याने आपल्या सोबतीला काही निवडक मोगल सैनिक घेतले आणि तो निघाला किल्ल्याच्या मागच्या दिशेने. दबक्या पावलांनी, बिलकुल आवाज न करता. किल्ल्याच्या मागच्या दिशेला पोहोचल्यावर फतेह खानाने आपल्या सैनिकांना आदेश दिला, “उपरवाले का नाम लो और उपर किले पार चढो, अगर कामयाब हो जोगे तो तुम्हारा नाम होगा” वर जायला कोणी तयार होत नव्हते, पण फतेह खान सुद्धा माघार घ्यायला तयार नव्हता, मग त्यातले काही सैनिक जीवावर उदार होवून किल्ल्यावर चढाई करायला तयार झाले. अंधाराचा फायदा घेवून झाडा झुडपाच्या सहाय्याने ते हळूहळू वर चढू लागले. त्यांनतर एका मागोमाग एक असे बरेचसे सैनिक वर जावू लागले.

एकंदरीत फतेह खानाचा बेत असा होता कि, किल्ल्यावरच्या मावळ्यांना पुढच्या बाजूने तोफगोळ्या मध्ये गुंतवून ठेवायचे आणि मग काही निवडक मोगल सैनिकांना किल्ल्यावर पोहोचवायचे. आणि मग दोरखंड लावून खाली उरलेले सगळ्या सैनिकांनी किल्ल्यावर जायचे आणि किल्ला काबीज करायचा. ठरल्याप्रमाणे किल्ल्याच्या मागे फतेह खानाचा बेत किल्ल्याच्या मागच्या बाजून चालू होता. किल्ल्यावर किल्लेदार सूर्याजी जेधे पुढच्या बाजूला मुख्य बुरुंजाजवळ होते. ते आणि त्यांचे सर्व मावळे फतेह खानच्या तोफांच्या करामती बघत होते. पण ते संभाजी राजांचे पराक्रमी सरदार होते, अशाही परिस्थितीत गाफील राहणारे ते नव्हते. २ गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या, त्या म्हणजे एक तर आज अचानकच फतेह खानाने रात्रीचा मारा सुरु केला आहे आणि दुसरे म्हणजे तोफांचे एकपण गोळा किल्ल्याच्या डोंगरावर पडत होते, याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतय. मग ते तडक घोड्यावर बसले आणि तडक निघाले, आपल्या सोबतीला त्यांनी २०० मावळे घेतले, त्यांनी स्वतःहून किल्ल्याच्या सर्व बाजूने पहारे देण्यास सुरुवात केली. ज्या वेळी ते किल्ल्याच्या मागच्या बाजूला आले तेव्हा त्यांना रात्रीच्या अंधारात चाललेला फतेह खान चा डाव समाजाला, तसे ते आणि त्यांचे मावळे बुरुंजावर दबा धरून मोगल सैनिकाच्यावर पळत ठेवून बसले.

वर चढणाऱ्या मोगल सैनिकांपैकी एक दोघे तटावर पोहोचले, ते आणखी वर येणार इतक्यात मावळ्यांच्या गोफणीत दगड धरले गेले आणि सप्प करून गोफण चालली, त्या मोगल सैनिकाच्या डोक्यात इतक्या जोरात धोंडा बसला कि तो घायाळ झाला आणि गडावरून खाली पडला. मग मात्र सगळे मावळे धावले तटबंदीच्या जवळ. त्यांनी वर चढणाऱ्या मोगलांवर गोफणीने दगडांचा जोरदार मारा केला, किल्ल्यावरच्या मोठ मोठाल्या दगडी शिळा ढकलून दिल्या. इतकेच नव्हे तर तेलात बुडवलेली कपडे आणि पोती पेटवली आणि त्या सैनिकाच्या अंगावर फेकून दिली. अचानक झालेल्या या मृत्यू तांडवा मुले सगळे मोगल सैनिक जीवाच्या आकांताने ओरडू लागले. काही सैनिक दगडांनी घायाळ होवून मेले तर काही पेटत्या कापडांनी भाजून मेले, आणि उरलेल्या सैनिकांनी त्या उंच डोंगरावून उड्या मारल्या. ते पाहून किल्ल्याच्या खाली उभे असलेले फतेह खान आणि त्याचे मोगल सैन्य जीव मुठीत धरून पळू लागले. गनीम (शत्रू) पळून जाताना बघून किल्ल्यावर मावळे आनंदित झाले, आणि जोर जोरात आरोळ्या देवू लागले, “हर हर महादेव, जय शिवाजी, जय शंभूराजे!!!!”     

कासम खान

औरंगजेबाने फतेह खानाला परत बोलावून घेतले. आणि कासम खान ला पाठवले. कासाम खान नव्या दमाची फौज घेवून रामशेज वर चालून आला. कासम खान ने रामशेज किल्ल्याभोवती एकदम कडेकोट पहारे लावले. किल्ल्यावर जाण्यासाठी थोडीसुद्धा वाट मोकळी ठेवली नाही. किल्ल्यावर दारुगोळा आणि अन्न धान्य पोहोचवण्याच्या सगळ्या वाट त्याने रोखून धरल्या होत्या. किल्ल्यापासून काही कोसावर संभाजी महाराजांनी पाठवलेले सरदार रुपजी भोसले, मानाजी मोरे रसद घेवून तयार होते. पण कासम खानच्या त्या कडक बंदोवस्तातून आणि कडेकोट पहाऱ्यातून त्यांना गडावर रसद पोहोचवता येत नव्हती. किल्ल्यावरचे अन्न धान्य संपत आले होते. गडावरील मावळ्यांवर वाईट दिवस आले होते, अन्नावाचून सगळ्यांचे हालहाल होत होते.  हि परीस्थिती पाहता ४ ते ५ दिवसात किल्ला कासम खानच्या हातात जाईल असे वाटत होते. पण निसर्ग मराठ्यांच्या मदतीला धावून आला. खूप जोराचा पाऊस पडला. हा पाऊस सलग २ दिवस पडत होता. या पावसामुळे किल्ल्याच्या सर्व परिसरात चिखल आणि पाणी झाले होते. किल्ल्याच्या एका बाजूला तर चिखल पाण्यामुळे मेलेल्या जनावारचे मांस साडू लागले. त्यामुळे सर्वत्र खूप दुर्गंधी पसरली होती. इतका घाण वास येवू लागला तो बिलकुल सहन होत नव्हता. त्या वासाने माणसे आणि जनावरे उलट्या करू लागले. मोगल सैनिकांना पहारा देणे खूपच अवघड होवू लागले. मग कासम खानाने त्या परिसरातला पहारा थोडा सैल केला. एका दिवसासाठी तेथील सैनिकांना दुसरीकडे पहारा देण्यास सांगितले.

तो दिवस सरला, रात्र झाली. रात्रहि सरली. दुसऱ्या दिवशी सकाळी पहारे परत पूर्ववत करण्यात आले. तेवढ्यात कासम खानाने किल्ल्यावर पहिले आणि त्याच्या लक्षात आले कि, किल्ल्यावरील मावळे ताजेतवाने दिसत होते, त्याच्या जीवात जीव आला होता. इतकेच नव्हे तर तिथे काही नवीन मावळे हि दिसत होते. कासम खान चक्रावून गेला. मग त्याला त्याची चूक लक्षात आली. आदल्या रात्री दुर्गंधी मूळे त्याने पहारे दिले केले होते, त्याच्याच फायदा घेवून दाबा धरून बसलेली रुपजी आणि मानाजी यांची फौज नवीन रसद, अन्न धान्य आणि दारुगोळा किल्ल्यावर पोहोचवून आले होते. कासम खानाला कळून चुकले कि रामशेज काबीज करणे हे फक्त स्वप्नच राहणार आहे. दिवसा किल्ल्यावरून मरहट्टे मोगलांवर मारा करायचे आणि रात्री संभाजी राजांनी पाठवलेली फौज मोगलांवर हल्ला करायची. किल्ल्याभोवती वेढा टाकलेल्या सैन्यावर आजूबाजूच्या झाडी मधून अचानक हल्ले व्हायचे. मोगालंना सळो कि पळो करून सोडले होते.

कासम खान देखील किल्ला जिंकू शकला नाही. हा किल्ला ६ वर्ष झुंजत होता.

पोर्तुगीज यांच्याविरुद्ध लढाई

गोव्याच्या पोर्तुगीजांना समजावून सांगूनही त्यांनी औरंगजेबाला मदत करण्याचा प्रयत्न केला. मग मात्र संभाजी महाराजांना स्वतःच गोव्यावर चाल करून जावे लागले.    

पोर्तुगीज गोव्यावर गेली एक शतक राज्य करत होते. त्यांनी पणजी शहराच्या सभोवती मजबूत तटबंदी उभी केली होती. गोव्याचा गव्हर्नर “काउंटी दि अल्वोरे” याने बऱ्याचश्या तोफा स्वसंरक्षणासाठी सज्ज ठेवल्या होत्या. त्यामुळेच संभाजी महाराजांना माहित होते कि गोव्यात शिरून पोर्तुगीजांवर आक्रमण करणे फार मोठे धाडस होईल. त्यामुळेच या गव्हर्नर ला गोव्याच्या बाहेर काढून त्याच्यावर हल्ला करण्याचा बेत संभाजी राजे अखात होते. गोव्याजवळील फोंडा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. संभाजी राजांनी ठरवले कि गोव्याच्या पोर्तुगीजांना याच किल्ल्यावर येणे भाग पाडायचे.

ठरलेल्या बेतानुसार शंभूराजांनी स्वतःच्या माणसांकडून गोव्यात अफवा पसरवण्यास सुरुवात केली कि “गोव्या जवळील फोंडा किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी ५ कोटींचा खजिना आणून ठेवला आहे, त्याच बरोबर बराचसा दारुगोळा हि जमा करून ठेवला आहे.” या वेळी संभाजी महाराज रायगड  किल्ल्यावर होते. गव्हर्नर ला हि बातमी माहित होती. गव्हर्नर ला माहित होते कि फोंडा किल्ल्याची तटबंदी मजबूत नाहीये. आणि किल्ल्यावर जास्त सैन्य सुद्धा नाहीये. त्याने विचार केला कि फोंडा किल्ल्यावर थोडेच मावळे आहेत, आणि मराठ्यांचा छत्रपती पण जवळ नाहीये. त्यामुळेच त्याला जोर आला आणि तो फोंडा किल्ल्यावर आक्रमण करायला निघाला. गव्हर्नर संभाजी राजांच्या गनिमी काव्यात बरोबर अडकला. त्याने आपल्या बरोबर ५ हजाराचे पोर्तुगीजी सैन्य घेतले आणि फोंडा किल्ल्यावर आक्रमण केले.

गव्हर्नर आपले पोर्तुगीजी सैन्य घेवून किल्ल्याजवळ पोहोचला तेव्हा रात्र झाली होती. अंधार पडला होता. पण त्याने ठरवले कि सकाळ पर्यंत वाट बघायची नाही, रात्रीच किल्ल्यावर आक्रमण करायचे. त्याने रात्रीच किल्ल्यावर चढाई केली. किल्ल्यावर कृष्णाजी कंक आणि येसाजी कंक हे पिता पुत्र किल्लेदार होते. पोर्तुगीजांनी किल्ल्यासमोरच्या एका टेकडीवर तोफा चढवल्या. या फिरंगी तोफा लांब पल्ल्याच्या होत्या. या टेकडी वरूनच ते मराठ्याच्या फोंडा किल्ल्यावर तोफ तोळे डागत होते. त्याच बरोबर पोर्तुगीजी सैनिक गोळ्या सुद्धा चालवत होते.

दुसऱ्या दिवशी पर्यंत हा मारा सुरु होता, त्या मार्याने फोंडा किल्ल्याच्या तटबंदीचा एक बुरुंज ढासळला होता. ते पाहून गव्हर्नर खुश झाला. त्याने आपल्या सैन्याला किल्ल्यामध्ये शिरण्याचा हुकुम दिला. पण किल्ल्यावरून होणाऱ्या मराठ्यांच्या माऱ्यापुढे एकही पोर्तुगीजी सैनिक पुढे सरकायला तयार नव्हता. पण गव्हर्नर च्या रेट्यापुढे त्याचे काही चालेना. मग काही पोर्तुगीज पुढे झाले आणि किल्ल्याजवळ आले. किल्ल्यावरून दगडांचा मारा झाला. मग मात्र पोर्तुगीज मागे हटले.    

पण तरीही सलग ४ दिवस त्या टेकडीवरून किल्ल्यावर तोफांचा मारा चालू होता. खरी परिस्थिती अशी होती कि अजून एखाद्या दिवसात किल्ला पोर्तुगीजांच्या हातात जाणार होता. पोर्तुगिजांचा गव्हर्नर तर याच खुशीत वेडा झाला होता. त्याला तर फोंडा किल्ल्यावर पोर्तुगिजांचा झेंडा दिसू लागला होता. किल्ल्यावरचे मावळे येसाजी कंक यांच्या हुकुमाप्रमाणे प्राणांची शर्थ करून किल्ला लढवत होते.

आणि इतक्यात…. दुरून, काही अंतरावरून धुळीचे लोट दिसू लागले, ललकाऱ्या ऐकू येवू लागल्या, “हर हर महादेव, शिवाजी महाराज कि जय, संभाजी महाराज कि जय”

फोंडा किल्ल्यावरचे सगळे मावळे तत्बाडीवर आणि बुरुंजावर उभे राहून तिकडे पाहू लागले… क्षणा क्षणाला तो आवाज वाढत होता. खुद्द शंभू राजे येसाजी कंकांच्या मदतीसाठी आले होते. ते पाहून किल्ल्यावारूनही त्यांना प्रतिसाद दिला गेला, किल्ल्यावरून घोषणा उठू लागल्या, “संभाजी महाराज कि जय ||”    

संभाजी महाराज, त्यांचे घोडदळ, पायदळ, सारी सेना आली होती फोंडा किल्ला राखायला, पोर्तुगीजांना पराभवाची धूळ चाखवायला. पोर्तुगीजांना पण हे लक्षात आले, मग मात्र त्यांचे धाबे दणाणले, भीतीने त्यांची गाळण उडाली. आत्ता पर्यंत गव्हर्नर ने संभाजी महाराजांचे पराक्रमाचे किस्से फक्त ऐकले होते, आज साक्षात त्यांनाच समोर बघून गव्हर्नर पूरता घाबरून गेला, खचून गेला. त्याने लगेच आपल्या सैन्याला मागे फिरण्याचा आदेश दिला. पोर्तुगीजी सैन्य देखील याच आदेशाची वाट बघत होते, आदेश मिळताच तेही पाठीला पाय लावून पळत सुटले.  किल्ल्यावरील मावळे हे दृश्य पाहून फारच आनंदित झाले.    

गोव्याचा गव्हर्नर Count De Alwore याला मराठ्यांनी जेरीस आणून सोडले होते.

मराठ्यांचे गोव्यावरील आक्रमण इतके जबरदस्त होते कि, गोव्याच्या गव्हर्नर ला त्याची राजधानी पणजी पासून खाली मार्मा गोव्याला हलवावी लागली.

संभाजी महाराज यांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी गोवेकर पोर्तुगीजांची केलेली वाताहत पाहून गोव्यातील मराठी लोक खूप आनंदित झाले. गोव्यातील कित्येक लोक वर्षानुवर्षे पोर्तुगिजांचा जाच, त्रास छळ आणि अत्याचार सहन करत होते. कित्येक वर्षानंतर आज ते स्वातंत्र्याचा आनंद घेत होते. मागील काही वर्षात पोर्तुगीजांनी गोव्यातील कित्येक देवळे उध्वस्त केली होती, याचाच सूड घेण्यासाठी गोव्यातील काही हिंदू लोक एकत्र आले आणि त्यांनी गोव्यातील ख्रिश्चनांच्या एका चर्चवर हल्ला केला, त्या चर्च ची तोडफोड आणि जाळपोळ सुरु केली. हि बातमी शंभू राजांच्या कानावर आली, परंतु स्वतःच्या धर्माबद्दल अभिमान आणि परधर्माबद्दल आदर असलेले संभाजी राजे यांना हि बातमी आवडली नाही. ते म्हणाले, “आमच्या आबासाहेबांनी स्थापन केलेले हे स्वराज्य कोणाच्या धर्माच्या द्वेषावर उभे राहिलेले नाहीये.” छत्रपती संभाजी महाराज यांनी हुकुम दिला कि, “ताबडतोब चर्च ची जाळपोळ थांबवा”. शंभू राजांच्या आज्ञेचे पालन केले गेले. संभाजी महाराज यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या काही हिंदु लोकांना धर्मात परत घेतले.

गव्हर्नर आधीच पणजी सोडून गेला होता, त्याला खात्री होती कि संभाजी महाराजांना पराभूत करणे अश्यक्य आहे. त्याला भीती होती कि शंभूराजे एक न एक दिवस पूर्ण गोवा जिंकून घेतील. म्हणूनच त्याने ठरवले कि संभाजी महाराज यांच्या बरोबर तह करून आपला जीव वाचवायचा. यासाठीच गव्हर्नरने आपला वकील शंभू राजे याच्याकडे पाठवला होता. यानंतर काही दिवसातच संभाजी राजे यांनी पोर्तुगिजांबरोबर तहाची बोलणी केली. आणि ते रायगड ला परत आले.

दख्खन स्वारी – दक्षिण प्रांतातील चिक्कदेव राजावरील आक्रमण

दक्षिणेतील सरदार औरंजेबाला सामील होवू नये यासाठी संभाजी राजांनी मैसूर च्या चिक्कदेव राजाशी मैत्रीचा प्रयत्न केला होता.

पण त्या गर्विष्ट चिक्कदेव ने मराठ्यांच्या ३ पराक्रमी सरदारांची कत्तल करून त्यांची मुंडकी श्रीरंगपट्टणम च्या वेशीवर टांगली होती.

औरंगजेबाचे स्वराज्यावरील आलेले संकट सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्याकडे काही काळ सोपवून छत्रपती संभाजी महाराज दक्षिणेकडे निघाले.      

संभाजी राजांनी त्रिचनापल्लीच्या पाषाणकोट ला वेढा घातला. फार मोठा रणसंग्राम झाला. मराठ्यांनी किल्ल्यावर अग्नी बाणांचा वर्षाव सुद्धा केला.

अखेरीस किल्ला जिंकला. त्यानंतर मात्र मैसूरकर चिक्कदेवाचे धाबे दणाणले आणि तो तह करण्यासाठी तयार झाला.

छत्रपती संभाजी महाराजांच्या पकडण्याची कहाणी

छत्रपती संभाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील एकमेव राजे होते ज्यांनी आयुष्यात कधीही युद्ध गमावले नाही. संभाजी महाराज मरेपर्यंत अजिंक्य राहिले. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा अंदाज यावरून लावता येतो की सम्राट औरंगजेबाने संभाजी महाराजांना पकडण्यासाठी दोन लाखांची फौज पाठवली होती. 

पण संभाजी महाराजांची दहशत एवढी होती की संपूर्ण मुघल सैन्याने घेरल्यानंतरही एकही मुघल सरदार किंवा सैनिक संभाजी महाराजांकडे जाऊन दांडी मारण्याचे धाडस करत नव्हते. खूप प्रयत्नानंतर संभाजी महाराजांना कैद करण्यात आले. पण मुघल सैन्य इतके घाबरले की संगमेश्वर ते बहादूरगड हे अंतर अवघ्या 2 दिवसात पूर्ण झाले. आपल्या राजाला मुघलांनी कैद केल्याचे मराठ्यांना कळले तर स्वराज्याच्या सर्व सीमा बंद होतील आणि स्वराज्याच्या हद्दीत जो कोणी मुघल असेल त्याचा मृत्यू निश्चित आहे हे त्याला माहीत होते. तो बहादूरगडला पोहोचेपर्यंत त्याच्या जीवात जीव नव्हता, तो खूप घाबरला होता, त्याला लवकरात लवकर मराठ्यांच्या आवाक्याबाहेर पोहोचायचे होते.

संभाजी महाराजांना कैद झाल्याची बातमी औरंगजेबाला देण्यात आली. तेव्हा औरंगजेबला खूप आनंद झाला कारण दख्खन जिंकण्याचे औरंगजेबाचे स्वप्न होते पण हे सर्व करण्यासाठी मुघलांच्या मार्गात एकच कट होता. संभाजी महाराज कोण होते. त्यांच्याशिवाय दख्खन जिंकणे मुघलांना अशक्य होते. त्यामुळे मुघल सम्राट औरंगजेबाला ही बातमी कळताच त्याने उत्सवाची घोषणा केली, हा दिवस त्याच्यासाठी ईदपेक्षा कमी नव्हता. शहरात सर्वत्र उत्सवाचे वातावरण होते. प्रत्येकाला लोकसंभाजी बघायचे होते. ज्याने संपूर्ण मुघल सल्तनत आपल्या नाकावर टिच्चून ठेवली आहे, तो संभाजी कसा दिसतो हे लोकांना पाहायचे होते. संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर त्यांना औरंगजेबाच्या दरबारात हजर करण्यात आले. त्यावेळी संभाजी महाराजांसोबत त्यांचे जवळचे मित्र कवी कलशही उपस्थित होते.

दरम्यान, स्वराज्याच्या काळात संभाजी महाराजांना मुघल सैन्याने कैद केल्याचे कोणालाच कळले नाही. किंवा इतकंच म्हणा की पूर्ण काळजी घेतली गेली हे कुणाला कळू नये. मुघलांनाही ते जवळजवळ अशक्यच होते. कारण संभाजी महाराजांना पकडण्याचा मुघलांनी यापूर्वी दोनदा प्रयत्न केला होता, पण प्रत्येक वेळी संभाजी महाराज मुघलांच्या नाकाखाली निसटले. संभाजी महाराजांचे मेहुणे गणोजी शिर्के यांनी वतन (जहागिरी/जमीनदारी) देण्याचे वचन संभाजी महाराजांचे वडील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरही ‘ घर का पिरडी लंका धाये’ अशीच एक म्हण आहे .

 पण संभाजी महाराजांनी सत्तेवर येताच त्यांचा देश संपवला. या गोष्टीवरून संभाजी महाराजांचे मेहुणे संभाजी महाराजांवर खूप रागावले, त्यांना कोणत्याही प्रकारे बदला घ्यायचा होता. मुघलांनी हा तह करून गणोजी शिर्के यांच्याशी हातमिळवणी केली आणि संभाजी महाराजांच्या बदल्यात मोठी जमीन देण्याचे वचन दिले. संभाजी महाराजांचा बदला घेण्यासाठी आणि मायदेश मिळवण्यासाठी गणोजी शिर्के यांनी स्वराज्याशी गद्दारी करून संभाजी महाराजांना पकडले. या कटात गणोजी शिर्के यांच्यासह प्रल्हाद निराजी, मानाजी मोरे, येसाजी आणि सिरोजी फजर्द (हिरोजी फजर्दचे भाऊ) यांनीही मदत केली.

संभाजी महाराजांना तुळापूरला नेल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना मुघलांनी कैद केल्याची बातमी स्वराज्यात पसरली. त्यानंतर स्वराज्यात भूकंप झाला. स्वराज्याचे रक्षक छत्रपती यांना मुघलांनी कैद केले. पण तरीही हार न मानता मराठ्यांनी संभाजी महाराजांची सुटका व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण तरीही अपयश आले.

तिकडे औरंगजेबाच्या दरबारात औरंगजेबाने संभाजी महाराजांना स्वराज्याच्या बदल्यात जीव देण्याची ऑफर दिली आणि मुस्लिम होण्यास सांगितले पण संभाजी महाराजांना हिंदू धर्माची खूप ओढ होती, ही ऑफर ते कधीच स्वीकारू शकले नाहीत आणि त्यांनी औरंगजेबालाही तशीच ऑफर दिली होती. मोठ्या अभिमानाने नाकारले. ही गोष्ट औरंगजेबाच्या मनाला भिडली आणि संभाजी महाराजांना अत्यंत क्रूर शिक्षा झाली. डोळे काढणे, कातडी कापून टाकणे, जीभ कापून टाकणे आणि मरेपर्यंत सर्व यातना करणे अशी शिक्षा होती. सुमारे चाळीस दिवस संभाजी महाराजांवर अगणित अत्याचार चालूच राहिले, पण स्वराज्यावर निष्ठा दाखवत संभाजी महाराजांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आणि औरंगजेबासमोर आश्रय घेतला.

संभाजी महाराजांच्या धर्माशी असलेल्या या आसक्तीमुळे त्यांना धर्मवीर म्हणतात. मराठीत या विषयावर अनेक कविता लिहिल्या गेल्या आहेत.

चाळीस दिवसांच्या अतोनात छळानंतर, 11 मार्च 1689 रोजी वयाच्या 32 व्या वर्षी संभाजी महाराजांचे दुःखद निधन झाले. पत्नी येसूबाईला मागे ठेवून ते निघून गेले. मराठ्यांच्या इतिहासातील ही सर्वात भयंकर आणि अस्वस्थ करणारी हत्या होती. औरंगजेबाला वाटत होते की संभाजी महाराजांनंतर स्वराज्याचे रक्षण करणारे कोणतेही महत्त्वाचे नेतृत्व नाही आणि आता स्वराज्य सहज मिळवता येईल आणि मुघल सल्तनतमध्ये समाविष्ट करता येईल, पण संभाजी महाराजांच्या हत्येनंतर दख्खनमध्ये वादळ उठले.

संभाजी महाराजांच्या निधनानंतर महाराणी ताराबाई आणि त्यांचे पुत्र संभाजी महाराजांचे धाकटे बंधू राजाराम महाराज यांनी तरुण वयातच छत्रपतींची गादी घेतली आणि मुघलांच्या प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. तेव्हा राजाराम महाराजांनी स्वराज्याचे तिसरे छत्रपती म्हणून शपथ घेतली आणि स्वराज्य उत्तम प्रकारे सांभाळले. आणि शेवटी दख्खन काबीज करण्याचे औरंगजेबाचे स्वप्न स्वप्नच राहिले. आणि मराठ्यांची सत्ता फुलत राहिली. मग संभाजी महाराजांनंतर छत्रपतींचे सिंहासन त्यांचे धाकटे बंधू राजाराम महाराज यांनी आपल्या ताब्यात घेऊन छत्रपती झाले आणि मुघलांच्या प्रत्येक हल्ल्यापासून स्वराज्य राखले.

आता संभाजी महाराजांची समाधी दोन वेगवेगळ्या ठिकाणी आहे. तुळापूर आणि वढू बुद्रुक या दोन्ही गावांमध्ये त्याची वेगळी कहाणी आहे.

एकूण पृष्ठदृश्ये