शाहराजा दुसरा- (इ.स.१६८५-१७११)
व्यंकोजीपुत्र शाहराजांची कारकीर्द शांतेतत पिर पडली. शाहराजांच्या कारकिर्दीत फारसे युद्धाचे प्रसंग आले नाहीत. शाहराजा दुसरा यांच्या कारकीर्दीत महत्वपूर्ण घटना म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांना साह्य केल्याने झुल्फीकारखानाच्या स्वारीस शाहराजास तोंड द्यावे लागले.
महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकीर्दीपासून मुगलांविरूद्ध मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध चालू होते.१६८९ मध्ये संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज छत्रपती झाले. १६८९ मध्ये झुल्फीकारखानाची रायगडावर स्वारी झाली, त्यावेळेस मराठ्यांचे छत्रपती राजाराम महाराज औरंगजेबास चुकवून जिंजीकडे आलेले होते. १ एप्रिल १६९० रोजी झुल्फीकारखानाने जिंजीस वेढा घातला. या वेढ्यात झुल्फीकारखानाच्या मदतीस औरंगजेबाचा वजीर आसदखान व शहजादा कामबक्ष होते.
इ.स.१६९२ पर्यंत जिंजी जिंकण्यास मुघलांना यश आले नाही. या वेढ्यात शाहराजा दुसरा यांनी राजाराममहाराजांना सैन्य आणि पैशांची मदत केली. शाहराजा राजारामांचा चुलत भाऊ असल्याने ते राजारामस मदत करीत असणारच असे झुल्फीकारखानास वाटले. जिंजी जिंकण्यासाठी झुल्फीकारखानास वाटले. जिंजी जिंकण्यासाठी झुल्फीकारखानास आधी मराठ्यांना मिळत असलेली तंजावरचीषमदत बंद करण्यासाठी इ.स. १६९१ मध्ये तंजावरावर स्वारी करावी लागली. ह्या स्वारीत झुल्फीकारखानाने शाहराजा दुसरा यांजकडून खंडणी घेतल्याव्यतिरीक्त दुसरे काही उल्लेख सापडत नाहीत.
१६९९ मध्ये औरंगजेबाने झुल्फीकारखाना ऐवजी दाऊदखानाची कर्नाटकचा सुभेदार म्हणुन नियुक्ती केली. याच्याशी शाहराजाचे युद्धाचे प्रसंग आले नाहीत. "इ.स.१६९९ मध्ये शाहराजाने ट्रौकीबारला चाळीस हजार सैन्यासह वेढा घातला" याव्यतिरिक्त इतर कोणत्याही युद्ध प्रसंगाची माहिती उपलब्ध होत नाही. शाहराजा दुसरा यांनी मराठ्यांशी बिघडलेले संबंध पुनः सुधारले आणि अधिक दृढ केले.
२७ सप्टेंबर १७११ रोजी शाहराजा यांचा मृत्यू झाला. राज्याचे संरक्षण करीत असतानाच साहित्य आणि कला क्षेत्रातही शाहराजा दुसरे यांनी संस्मरणीय कामगिरी केली. सर्व दृष्टीने शाहराजांची कारकीर्द वैभवशाली ठरली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा