शहाजी राजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जहागिरीचा हक्क त्यांचा मुलगा व्यंकोजी यांस प्राप्त झाला. शहाजी राजांचा थोरला मुलगा संभाजी शहाजी राजांबरोबर कर्नाटकातच होता. परंतु संभाजीचा मृत्यु कनकगिरीच्या युद्धात झाला, त्यामुळे जहागिरीची सूत्रे स्वाभाविकपणे व्यंकोजीराजांकडे आली. व्यंकोजी हे शहाजीराजांची दुसरी पत्नी तुकाबाई हिचे पुत्र होते.
व्यंकोजीराजांच्या जन्मतिथी बद्दल फार थोडी माहिती उपलब्ध आहे. तंजावर च्या बृहदीश्वर मंदिरातील शिलालेखात शिवजन्माची साल १६२९ मानले आहे मात्र शिलालेखात तारखा व इ.स. च्या बाबतीत बऱ्याच चुका आहे. त्यामुळे शिवजन्माची साल ही चुकलेले आहे. व्यंकोजी हे शिवाजी महाराजांचे कनिष्ठ बंधू होते, त्यामुळे व्यंकोजीचे जन्मसाल 1629 हे मानता येत नाही. देवीसिंग चौहाण मात्र शके १५५२ माघ फाल्गुन मध्ये व्यंकोजी राजांचा जन्म झाला असे मानतात. याचा अर्थ शिवजन्मानंतर लवकरच व्यंकोजी राजांचा जन्म झाला असावा.
थोरल्या संभाजी राजांच्या मृत्यूनंतर शहाजीराजांनी व्यंकोजींवर कर्नाटकातील जहागिरीची जबाबदारी सोपविली. व्यंकोजीराजांनी आपल्या जहागिरीचा कारभार सांभाळला त्याचबरोबर विस्तारही केला. व्यंकोजीराजांनी त्यानंतर स्वपराक्रमाने तंजावर जिंकून घेतले. त्रिचनापल्लीचा विजयराघव व तंजावरचा रघुनाथ नायक यांच्यातील यादवीचा फायदा घेऊन आदिलशहाचा सरदार म्हणून १६७५ मध्ये व्यंकोजीराजांनी तंजावर जिंकले. व १६७६ मध्ये व्यंकोजीराजे तंजावरचे अधिपती बनले.
तंजावर जिंकल्यानंतर व्यंकोजीराजांनी आपली राजधानी बंगळूरहून तंजावर हलविली. व्यंकोजी राजांच्या कारकीर्दीत घडलेली सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे शिवाजी महाराजांशी व्यंकोजी यांचा झालेला संघर्ष. दक्षिण दिग्विजयाच्या वेळी छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांनी आपला वडिलोपार्जित जहागिरीतील वाटा मागितला. व्यंकोजीराजांनी शिवाजी महाराजांची भेट घेतली. परंतु समझोता झाला नाही. नंतर थोडा संघर्ष झाल्यावर तह होऊन समेट झाला. या स्वारी पासून पुढे इतिहासात तंजावर व स्वराज्यातील मराठ्यांचे वारंवार चांगले संबंध आले.
व्यंकोजी राजांनी आपल्या पराक्रमाने जहागिरीचे संरक्षण केले. व्यंकोजींनी नायक राजांप्रमाणे स्वतंत्र सत्ता स्थापन केली, त्याचबरोबर साहित्य माचे क्षेत्रही समृद्ध केले. अनेक कवींना आश्रय देऊन वाड्मय रचनेला प्रोत्साहन दिले.
व्यंकोजी राजांचा मृत्यू १६८४-१६८५ डिसेंबर-जानेवारीत झाला. व्यंकोजी राजांनंतर त्यांचा जेष्ठ पुत्र शाहराजा दुसरे तंजावरच्या गादीवर आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा