व्यंकोजी राजे दुसरे उर्फ बाबासाहेब (इ.स. १७३५ ते १७३६)
व्यंकोजी राजे दुसरे यांची कारकीर्द फारच कमी म्हणजे एकच वर्षाची झाली. व्यंकोजीराजांना त्यांचा भाऊ सयाजी यांनी कट कारस्थाने करून पदच्युत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे व्यंकोजीराजे वेडे होऊन त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद बृहदीश्वर शिलालेखात आहे. त्यातील मजकूर पुढील प्रमाणे -
"बाबासाहेब राजे उपद्रवाने शके १६५८ मध्ये पिंगळ संवत्सरी देवगतीस पावले"
व्यंकोजी राजांचा मृत्यू इसवी सन १७३६ मध्ये झाला. व्यंकोजीराजे दुसरे यांच्या मृत्यूनंतर तंजावरची सुत्रे त्यांची विधवा पत्नी सुजानबाई यांच्याकडे जवळजवळ तीन वर्षे होती.
व्यंकोजीराजे हे तामिळ मराठी आणि उत्तर हिंदुस्तानी भाषेचे चांगले जाणकार होते. व्यंकोजीराजांनी या तिन्ही भाषेत रचना केल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा