सुजानबाई

 


सुजानबाई- (इ.स. १७३६-१७३८)
तंजावरचे व्यंकोजी दुसरे यांच्या मृत्यूनंतर तंजावरची सुत्रे त्यांची विधवा पत्नी सुजानबाई यांच्याकडे जवळजवळ तीन वर्षे होती. सुजानबाई यांनी तुळजाराजे पहिले यांचा मुलगा सयाजी यांच्या नावाने राज्याची सूत्रे हातात घेतली.
व्यंकोजी दुसरा यांच्या काळापासून अर्काटचा नवाब दोस्तअली चा सेनापती व जावई चंदासाहेब याची दृष्टी तंजावर कडे होती. इसवी सन १७३५ मध्ये चंदासाहेबानी तंजावरावर स्वारी केली. तेव्हा तंजावरकरांनी पेशव्यांकडे मदत मागितली असा पुरावा पेशवेकालीन कागदपत्रांमधून मिळतो.
इसवी सन १७३८ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी लिहिलेल्या पत्रात तंजावरला मदतीला जाण्यास रघुजी भोसले यास आज्ञा केलेली आढळते. रघुजी भोसले आणि फत्तेसिंह भोसले यांच्यापुढे चंदा साहेबाचे काही चालले नाही शेवटी चंदासाहेबाने मराठ्यांना खंडणी देण्याचे कबूल करुन माघार घेतली.
इ.स. १७३५ ते १७३९ या काळात तंजावरच्या गादीवर आलेले वारसदार वादग्रस्त आणि दुर्बल होते. त्यापैकी पहिला तथाकथित वारसदार काटराजा उर्फ शाहूजी याने व्यंकोजी दुसरामे यांच्या मृत्यूनंतर आपण तंजावर चे वारस आहोत असे भासवून तंजावरचा किल्लेदार सय्यद खान याच्या मदतीने सत्ता हस्तगत केली. ही हकिगत बृहदीश्वर शिलालेखात आहे.
काटराजाने सत्ता हस्तगत करताना इंग्रज आणि फ्रेंच यांना ही लाच देऊन वश करून घेतले होते. परंतु लवकरच तो कुप्पी किंवा रुपी नावाच्या परटिणीचा मुलगा असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे सर्व दरबार काट राजाच्या विरोधात उभा राहिला. दरबारातील ज्येष्ठ मंत्र्यांनी या तथाकथित वारसास म्हणजे काटराजास पदच्युत केले आणि तुळाराजा पहिला यांचा मुलगा सयाजी यास तंजावरच्या गादीवर बसविले.
सयाजीराजे दुर्बल असल्यामुळे त्यांचे अल्प कारकिर्दीत गोंधळ निर्माण झाला. सुजानबाई हा गोंधळ दूर करू शकल्या नाही. तंजावर करांचे जेष्ठ सरदार मल्हारजी गाडेराव, मानाजी जगताप, अनप्पा शेटगे या सरदारांनी सयाजीस दूर करून सरभोजी पहिला यांचा मुलगा प्रतापसिंह यांस इसवी सन १७३८ मध्ये तंजावरच्या गादीवर बसविले.
या घटनेबरोबरच सुजानबाई यांचा तंजावरच्या कारभारावरील प्रभाव संपला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

एकूण पृष्ठदृश्ये