तंजावरचे मराठा राज्यकर्ते

 



दक्षिणेतील त्रिचनापल्लीचा विजय राघव आणि तंजावरचा रघुनाथ नायक यांच्यातील यादवीचा फायदा घेत आदिलशहाचा सरदार म्हणून इसवी सन १६७५ मध्ये व्यंकोजीराजांनी तंजावर जिंकले. व इसवी सन १६७६ मध्ये व्यंकोजीराजे तंजावरचे अधिपती बनले.
बढेविया येथील रजत पटात ३० डिसेंबर १६७६ रोजी व्यंकोजीने तंजावरावर आपले प्रभुत्व प्रस्थापित केल्याचा उल्लेख आहे.
(Reference- Fifty Maratha Copper Plates)
तंजावरच्या शिलालेखात इसवी सन १६७५ मध्ये व्यंकोजीने तंजावरावर प्रभुत्व प्रस्थापित केल्याचा उल्लेख आहे. परंतु शिलालेखात कालोल्लेखाच्या बाबतीत बराच गोंधळ होतो. त्यामुळे बढेविया ताम्रपटातील माहितीच प्रमाण मानावी लागते.
तंजावर जिंकल्यानंतर व्यंकोजी राजांनी आपली राजधानी बंगळूरहून तंजावरला हलविली. त्यांनी १६८५ दहा वर्ष तंजावरवर राज्य केले. त्यानंतर भोसले घराण्यातील अनेक शासकांनी तंजावरवर राज्य केले.
१८५५ साली तंजावर चे शिवाजी दुसरे यांच्या काळात लाॅर्ड डलहौसीच्या नव्या धोरणानुसार इंग्रजांनी तंजावर संस्थान दत्तक नामंजूर करून खालसा केले.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

एकूण पृष्ठदृश्ये